Breaking News

विद्यापीठ व युजीसीने ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षांच्या यंत्रणेमध्ये मध्ये सुधारणा करावी याकरिता राष्ट्रवादी विद्यार्थांचे आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज – राजेश सोनावणे

नाशिक (दि.१९) – विद्यापीठ अंतर्गत अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन देताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून वेळे अभावी तसेच इतर त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत आहे. यावर उपाययोजना करण्यास विद्यापीठ आणि युजीसी सपशेल अपयशी ठरल्यामुळे याविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अॅड.चिन्मय गाढे व शहराध्यक्ष गौरव गोवर्धने यांच्या अध्यक्षतेखाली बीवायके महाविद्यालयाबाहेर कोविड-१९ च्या संदर्भातील सर्व शासकीय सूचनांचे पालन करून निदर्शने करण्यात आली.

सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विद्यापीठाअंतर्गत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आल्या. मात्र या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत असून त्यांचा मानसिक छळ होत आहे. या अनुषंगाने परीक्षा पद्धतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांना पुढील अडचणी येत आहे. १) नियोजनशुन्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्विस प्रोव्हायडर, हेल्पलाईन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई, MCQ प्रश्नांची प्रश्नपेढी(QUESTION BANK) न पुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. 2) ऑनलाईन परिक्षेत प्रश्न कसे असतील याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांवर तणाव येत आहे. 3) डिव्हाईसचा व कनेक्टिव्हीटीचा अभाव व त्यावर मात केली की ऑनलाईन पेपरचे लॉगइन होत नाही, लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच तर तो सबमिट होत नाही असे एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांना येत आहे. 4) विद्यार्थ्यांना प्रश्न न दिसणे,साईट वर फक्त MCQ चे ऑपशन येतात. 5) वेळोवेळी विद्यापीठाची साईट क्रॅश होते. 6) वेबसाईट मध्ये अडचणी आल्यामुळे परीक्षा वेळेवर सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांना कित्येक तास ताटकळत रहावे लागते. 7) परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विद्यापीठाची हेल्पलाईन सतत व्यस्त लागते. 8) परीक्षेच्या वेळेवर पेपर ओपन न होता दोन चार तासांनी पेपर सुरु होतो तर काही विषयांचा पेपर अगदी रात्री उशिरापर्यंत सुरु होतो तर काही वेळेस तो पुढेही ढकलावा लागतो. 9) एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परिक्षा व्हायला हव्या होत्या.त्यामुळे सर्व्हरवर ताण आला नसता.या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आहे असे वाटत नसल्यामुळेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यापीठाच्या या नियोजनशून्य कारभाराचा व ढिसाळपणाचा जाहीर निषेध करत हे निवेदन देण्यात आले. तसेच यापुढेही परीक्षा अशाच पध्दतीने सुरू राहिल्यास विद्यापीठासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा हि यावेळी निवेदनातून देण्यात आला.

याप्रसंगी विद्यासागर घुगे, किरण जगझाप, तुषार जाधव, चेतन देशमुख, आकाश कोकाटे, अमोल पाटील, पराग सानप, अजय चव्हाण, शंतनू घुगे, ऋषभ पवार, कृष्णा जाधव, राकेश खैरे, क्षितीज माने, शामज काझी, सूर्या चव्हाण, पार्थ भावसार, संकेत क्षीरसागर, शाम सिंग, तुषार बडगुजर, आदर्श रॉय, सचिन गाडगे, महेश सोनवणे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.