शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे
नाशिक- जनसेवेचे व्रत घेऊन अनेक डॉक्टर्स देशभरात काम करीत आहेत. कोविद काळात डॉक्टर्स ची भूमिका अतिशय महत्वाची राहिली . लहानपणी माझा भ्रम होता की डॉक्टर्स कधीच मारत नाही, पण आज कळते की डॉक्टर हा सुधा माणूसच आहे. कोरोंना काळात अनेक डॉक्टर्स बाधित झाली आहेत. त्या सोबतच अनेक पोलिस कर्मचारी, पालिका कर्मचारी, शासकीय, अशासकीय संस्थांचे सेवाभाव ठेऊन कार्य करणारे अनेक लोक आज कोरोंना ने बधीत झाली आहेत. कोरोंना रूग्णांच्या बाबतीत भारत 2 नंबर वर आहे. तर महाराष्ट्रात 10 हजारच्या वर नवीन केसेसची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगायला हवी. सोशल डिस्टन्सिंग ठेवायला हवे, मास्क वापरायला हवा. असे प्रतिपादन देशाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले. दि. 18 ऑक्टोबर रोजी जेलरोड येथील नारायणबापू नगर येथे धर्मार्थ दवाखान्याचे उद्घाटन प्रसंगी ना. आठवले बोलत होते. व्यासपीठावर आर पी आय चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, नगर सेवक दिनकर आढाव, नगर सेवक प्रशांत दिवे, नगरसेविका मंगला आढाव, आर. पी. आय. शहर प्रमुख समीर शेख, रवी वाघमारे, शेखर भालेराव, मुंबई येथील काकासाहेब खंबाळकर, मा. नगरसेवक हरिष भाडांगे, मा. नगरसेवक संजय भालेराव, ब्रह्माकुमारी शक्तिदीदी आदि मान्यवर उपस्थित होते.
आज माझे भरून आले आहे मन… कारण माझ्या हस्ते होत आहे हॉस्पिटल चे उद्घाटन…
उपचारासाठी येथे येतील जन…. आता आला आहे तो क्षण…. अशा नेहमी प्रमाणे आपल्या काव्य शैलीत ना. आठवले यांनी आपल्या वक्तव्याची सुरुवात केली. माझे शारीरिक वजन कमी झाले पण माझे राजकीय वजन वाढले आहे…. अशा वाक्यांनी सभेत आठवले यांनी हशा पिकविला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी कोरोंना काळात पक्षाने व कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचे गौरवूद्गार काढले. धर्मादाय दवाखान्यातून निश्चितच समाजुपयोगी कार्य व गोर गरीबांना रास्त सुविधा पुरविल्या जातील असा आशावाद व्यक्त केला.
नगर सेवक दिनकर आढाव, नगर सेवक प्रशांत दिवे यांनी आपल्या मनोगतातून पंकज कुलकर्णी व त्यांच्या तज्ञ डॉक्टर्सच्या टिम काढून सुरू केलेल्या धर्मार्थ दवाखान्याला सर्वोतोपरी मदत करण्याची इच्छा दर्शवत त्यांच्या या समाज उपयोगी कार्याला शुभेछा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सेवा प्राय: संस्थेचे अध्यक्ष पंकज कुलकर्णी यांनी सांगितले की गोर गरीब जनतेच्या कल्याणार्थ हा धर्मदाय दवाखाना सुरू करण्यात आला असून आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा मानस ठेऊन संस्थेने आपली वाटचाल सुरू केली आहे. संस्थेने शहरातील नामांकित तज्ञ डॉक्टर्सचा समूह या कार्यात सहभागी केला आहे. संस्थेने प्राथमिक वैद्यकीय सेवा तसेच पॅथॉलॉजी लॅब, फिजिओथेरपी, होमिओपॅथी, आयुर्वेद इत्यादि उपचार पद्धतीचा अवलंब करून रुग्णांना सेवा देण्यात येणार असल्याचे पंकज कुलकर्णी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवा प्रायं: संस्थेचे सर्वपदाधिकारी डॉ. अजय तांबे, डॉ. योगेश गांगुर्डे, संतोष निकम, अजीत ठिकले, कमलेश घायाळ, राजू जगताप, परशुराम दीक्षित, नितिन कुलकर्णी, हेमंत बसेल, संजय शेजवळ, सूरज कुमार आदि सदस्यांनी सफल नियोजन केले.
आभार प्रदर्शन आडव्होकेट मुक्ता बेलोकर यांनी तर सूत्र संचालन वर्षा कुलकर्णी यांनी केले.