शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे
मालेगाव महानगरपालिका, आयुक्त त्र्यंबक कासार यांच्या आदेशान्वये व मनपा, उपायुक्त(विकास) नितीन कापडणीस, यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एक चे प्रभाग अधिकारी हरीष डिंबर यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यां नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.
मालेगाव मनपा हद्दीतील सोयगाव-दाभाडी शिवरोड, सोयगाव शिवारातील ज्या नागरिकांनी अनाधिकृत नळ कनेक्शन घेऊन महापालिकेची पाणी चोरी केली आहे त्यांचेवर कारवाई करणेकामी दिनांक 20/10/2020 पासून धडक मोहीमेस सुरूवात करणेत आलेली आहे. या मोहिमे अंतर्गत पहिल्याच दिवशी सुमारे 25 अनाधिकृत नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. सोयगाव-शिवरोड भागातील अनेक नागरीकांनी नळ कनेक्शन अधिकृत करून देणेबाबत मागणी केलेली आहे. अशा नागरीकांनी नळ कनेक्शन मिळणेबाबत अर्ज सादर केल्यास त्याबाबत आवश्यक तो निर्णय देखील घेण्यात येईल.
सदर कारवाईचे अनधिकृत नळ कनेक्शन कारवाई मोहीमेत प्रभाग क्रमांक एक चे प्रभाग अधिकारी, श्री. हरीष डिंबर, पथकप्रमुख श्री. शमसुद्दीन शेख, श्री. राजेंद्र चव्हाण, पंकज शिंदे आदीं मनपा कर्मचारी अधिकारी यांनी भाग घेतला.