Breaking News

महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करा व जेलरोड ची अवजड वाहतूक बंद करा-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे.

रि.पा.ई (आठवले) उत्तर महाराष्ट्र शाखा निवेदन…


शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे

नाशिकरोड(प्रतिनिधी)आज दिनांक 26/10/2020 सोमवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे वतीने नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त श्री दिलीप स्वामी साहेब यांची महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन वरील विषायाचे निवेदन दिले…

निवेदनात म्हटले आहे की सध्या उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून सरकारने केलेली मदत अत्यंत तोकडी असून शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये अनुदान द्यावे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे पावसात घरे पडली त्यांना नवीन घरे बांधून द्या त्यांच्या मुलांचे शिक्षण मोफत करा त्याचप्रमाणे नाशिक रोड ते नांदूर नाका मार्ग जेलरोड येथील अवजड वाहतूक बंद करा अशी मागणी करण्यात आली…

याप्रसंगी आरपीआय (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रमोदजी बागुल,उत्तर महाराष्ट्र नेत्या तथा महिला आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष सौ.गुफाताई भदरगे,युवा नेते नितीन भाऊ ठोके, युवा नेते प्रशांतभाऊ गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…

About Shivshakti Times

Check Also

मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार -सांस्कृत‍िक कार्य मंत्री अमित देशमुख

मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ …

नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद

*नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद !*  शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी …

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *