Breaking News

तासगाव आगारातील २० चालक – वाहकांना कोरोना

मुंबईत सेवेदरम्यान लागण : आगारात खळबळ

प्रतिनिधी -युसूफ पठाण (शिवशक्ती टाइम्स न्यूज )

तासगाव बस आगारातील तब्बल ११ चालक आणि ९ वाहकांना कोरोनाची बाधा झाली आहे. सोमवारी ४३ चालक – वाहकांच्या अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या. यापैकी चालक – वाहक मिळून तब्बल २० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. १८ चालक – वाहकांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
दरम्यान एकाच दिवशी २० कर्मचा-यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने तासगाव आगारात एकच खळबळ उडाली आहे. हे सर्वजण मुंबई येथे वाहतूक सेवेसाठी गेले असताना कोरोनाची बाधा झाल्याने चालक आणि वाचकांत घबराट पसरली आहे.
मुंबईत लोकल सेवा बंद असल्याने बेस्ट च्या प्रवासी वाहतुकीसाठी सेवा बजावणा-या चालक आणि वाहकांवर मोठा ताण आहे. तो कमी करण्यासाठी राज्यातील सर्व एसटी बस स्थानकातून प्रत्येकी दहा गाड्यासह चालक व वाहक मुंबईत प्रवासी वाहतुकीची सेवा देण्यास पाठविण्यात आले होते.
तासगाव आगारातील ४५ चालक-वाहक मुंबईत सेवेसाठी गेले होते. ते परत आल्यानंतर सोमवारी ग्रामीण रुग्णालयात ४३ चालक आणि वाहकांची अँटीजन टेस्ट घेण्यात आली. यात २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आणि १८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. या प्रकाराने तासगाव आगारात एकच खळबळ उडाली आहे:

About Shivshakti Times

Check Also

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

बाजारपेठांना ‘लग्नसराई’चा साज…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण ) बदलापूर : तुळशी विवाहनंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *