Breaking News

पोलीस पाटील कृष्णा गरड यांनी जागरूकतेने केलेले कार्य उल्लेखनीय : जिल्हाधिकारी सुरज मांढरे

जिल्हाधिकारी कार्यालयात केला सत्कार

शिवशक्ती टाइम्स न्यूज

नाशिक, 26 ऑक्टोबर 2020 (जिमाका वृत्तसेवा)  संपादक – जयेश सोनार 
शहर व परिसरात अंमली पदार्थांची तस्करी होत असलेल्या घटना रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा कठोर पाऊले उचलत आहे. माडसंगवी येथे जवळपास साडेसहा लाखांचे अंमली पदार्थ काल पकडण्यात आले. हे पकडण्यासाठी पोलीस पाटील कृष्णा गरड यांनी दाखविलेली जागरूकता महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, ज्योती कावरे, जिल्हा विधी अधिकारी ऍड.हेमंत नागरे, तहसीलदार अनिल दौंडे, प्रशांत पाटील पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बबनराव बेंडकुळे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुभेच्छापत्र आणि पुष्पगुच्छ देऊन पोलीस पाटील श्री.कृष्णा गरड यांचा सत्कार केला.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, समाजाचे रक्षण करण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी जबाबदारीने काम करत असतो. सर्वच स्तरावर वेगवेगळे नियोजन करून प्रयत्न केले जात आहेत. शहरात अंमली पदार्थ मुख्यतः महामार्गावरून येत असतात; महामार्गावरील गावे तेथील पोलीस यंत्रणा, ग्राम यंत्रणा सक्षम असल्याचे पोलीस पाटील श्री. गरड यांनी दाखवून दिले आहे.

माडसंगवीचे पोलीसपाटील श्री. कृष्णा गरड हे सकाळी कामानिमित्त प्रवास मरत असताना त्यांना त्यांना काही लोक दिसले त्यांच्या संशयित हालचालींवरून त्यांना विचारले असता त्यांनी सुरुवातीला दमबाजी सुरू केले. प्रसंगावधान राखत श्री.गरड यांनी पोलिसांना कळविले. मात्र, संशयित पळून जाण्याचा यशस्वी झाले. पोलिसांना मिळालेल्या बॅग मध्ये गांजा नामक अमली पदार्थ होते. पोलीस पाटील श्री. गरड यांनी दाखविलेले प्रसंगावधान आणि जागरूकता अनुकरणीय असून जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांनी अशाप्रकारे काम करावे असेही जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी सांगितले.
0000000000

About Shivshakti Times

Check Also

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

नाशिक मनपा व क्रेडाईच्या ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित

*शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही-पालकमंत्री छगन भुजबळ* शिवशक्ती …

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा दल व समविचारी संघटनांच्या वतीने आंदोलन

शिवशक्ती टाइम्स न्यूज : मालेगाव- दिल्ली येथील सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील राष्ट्र सेवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *