मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवशक्ती टाइम्स न्यूज – कार्यकारी संपादक – राजेश सोनावणे
मालेगांव (प्रतिनिधी) : मालेगाव कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी नगर येथील मोरया शॉपिंग मॉल समोरील वर्दळीच्या रस्त्याच्या मध्यभागी खूप मोठे खड्डे पडले आहे. या ठिकाणी रात्री अंधारात खड्डा दिसतही नाही. त्या मुळे वाहन चालवताना दुचाकी स्वार कायम येथे पडतात. तसेच फोर विलर वाहन चालकांनाही मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे ,
या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वार्डातील लोकप्रतिनिधीनी त्वरित लक्ष देऊन त्या खड्याची दुरुस्ती करावी अशी तेथील रहिवासीची मागणी आहे. मा आयुक्त साहेबांनी संबधित विभागास सूचना देऊन कार्य मार्गी लावावे ही शिवशक्ती टाईम्स न्युज तर्फे विनंती . मोठी दुर्घटना घडल्यावर आपण सावधान होतो हा आपला स्वभाव बनलेला आहे तो बदलला पाहिजे. सावित्री नदीत ज्या प्रमाणे पुलं कोसळून जीवांची हानी झाली त्या नंतर नदीवर नवीन पुलं बांधण्यात आला परंतु जे जीव गेले ते परत आणता येणार का? ते शक्य नाही ! तरी त्वरित प्रशासनाने लक्ष देऊन कार्य संपन्न करावे ही जनता जनार्दन कडून कळकळीची प्रार्थना.