Breaking News

स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे राजाराम जाधव तर महिला व बालकल्याण सभापती पदी भाजपच्या सुवर्णा शेलार

मालेगांव मनपा स्थायी समिती सभापती म्हणून राजाराम बाबुराव जाधव यांची बहुमताने निवड झाल्याचे घोषीत….
मालेगाव : मनपा स्थायी समिती सभापती निवडी साठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेण्यात येणाऱ्या निवडीसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे होते.
मनपा महासभा सभागृहात आज दि.२७/१०/२०२० सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे स्थायी सभापती निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. या वेळी व्यासपीठावर पीठासन अधिकारी मा. जिल्हाधिकारी श्री.सुरज मांढरे, आयुक्त त्रंबक कासार, उपायुक्त विकास नितीन कापडणीस, उपायुक्त मुख्यालय रोहिदास दोरकुळकर, प्र.नगर सचिव पंकज सोनवणे होते. पीठासन अधिकाऱ्यांनी मुदतीत प्राप्त दोन उमेदवारांचे ४ नामनिर्देशन पत्र वैद्य असल्याने अनुक्रमे १. अन्सारी सबीहा मोहम्मद मुजम्मील व २ जाधव राजाराम बाबुराव, वैद्य उमेदवार घोषित करून प्रथम उमेदवार अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला. तदनंतर ११:३० वाजता कोणीही उमेदवारांनी माघार घेतली नाही म्हणून हात उंचावून निवडणूक प्रक्रिया बाबत सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी सुरज मांढरे यांनी दोन्ही उमेदवारांचे सूचक व अनुमोदक यांची पडताळणी केली. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हात उंचावून मतदान प्रक्रियेत एकूण १५ मतदारांपैकी ०५ मते अन्सारी सबिहा मोहम्मद मुजम्मिल यांना मिळाली तर शिवसेनेचे उमेदवार जाधव राजाराम बाबुराव यांना एकूण १० मते मिळाली.
त्यामुळे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मा.श्री सुरज मांढरे यांनी स्थायी समिती सभापती म्हणून जाधव राजाराम बाबुराव यांची बहुमताने निवड झाल्याचे घोषीत केले.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.