Breaking News

आता तुमच्या कन्फर्म तिकीटावरील नाव बदलून कुटुंबीय प्रवास करू शकणार; भारतीय रेल्वेची नवीन सुविधा

तुम्ही रेल्वेचा प्रवास करू शकत नसाल किंवा तुमच्याऐवजी आई, वडील, भाऊ, बहीण किंवा पत्नीला प्रवास करायचा असेल तर तुमच्या ऑनलाईन कन्फर्म तिकीटावरील नावातही आता बदल करता येऊ शकेल.

आयआरसीटीसी’ने याबाबतची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी गाडी सुटण्याच्या 24 तास आधी रेल्वे आरक्षण केंद्रावर ऑनलाईन तिकीट व संबंधित कागदपत्रे घेऊन जाणे आवश्‍यक आहे.

‘असं’ बदला तिकीटावरचं नाव..

▪️ ऑनलाईन तिकीटाची व दोघाही संबंधितांच्या ओळखपत्रांची झेरॉक्‍स काढावी.

▪️ आपल्या शहरातील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावर जाऊन एक अर्ज घेऊन त्यावर जे प्रवास करणार असतील त्यांचे नाव, पत्ता लिहावे.

▪️ त्यांची सर्व कागदपत्रे अर्जाला जोडून तेथील कर्मचाऱ्याकडे द्यावे.

▪️ यानंतर कन्फर्म तिकीटावर आई, वडील, सख्खे भाऊ-बहीण, पती- पत्नी यांच्या नावांत (एकाच प्रवाशाच्या) बदल होऊ शकतो.

📍 एका वेळी एकाच तिकीटासाठी ही सुविधा वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही सुविधा दिल्लीसह काही प्रमुख शहरांत सुरू असून देशभरातही ती लागू करण्यासाठी आयआरसीटीसी संकेतस्थळात तांत्रिक बदल करण्याचे काम सुरू आहे.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *