संबधित अधिकार्याला ऐक दिवसाची मे.न्यायालयाने दिली पाेलीस काेठडी…!
प्रतिनिधी – युसूफ पठाण (शिवशक्ती टाइम्स न्यूज)
नंदुरबार : येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर अश्लील चित्रफीत व्हायरल केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एकूण ५३ सदस्य आहेत.
त्यात सहा महिला व ४७ पुरुष आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सहभाग असलेला व्हॉट्सॲप ग्रुप आहे.
या ग्रुपवर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक नियोजन अधिकाऱ्याने २६ ऑक्टोबरला रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी अश्लील चित्रफीत व्हायरल केली.
हा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रुपमधील सदस्यांच्या लक्षात आला.
या प्रकारामुळे ग्रुपमध्ये असणाऱ्या महिला सदस्यांचा अवमान झाला.
संबंधीतास अटक
घटनेची गंभीर दखल घेऊन कार्यालयीन अधीक्षक वसावे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीवरून संशयित राहुल इदे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
संशयितास अटक केल्यानंतर एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, बुधवारी (ता. २८) इदे यांची जामिनावर मुक्तता झाली.
अनवधानाने हा प्रकार घडल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर पुढील तपास करीत आहेत.