शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी = युसूफ पठाण
नवी दिल्ली – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत दोन चांगल्या बातम्या आहेत.
पहिली म्हणजे योजनेंतर्गत दिला जाणार 2 हजार रूपयांचा हप्ता हा डिसेंबर मध्ये येण्याची शक्यता आहे.
आणि दुसरी म्हणजे, कागदपत्रांतील चुकांमुळे तुम्हाला जर यापूर्वीचा हप्ता मिळाला नसेल तर कागदपत्रांपमधील चुका दुरूस्त करून पुन्हा अर्ज करू शकता.
⭕डिसेंबरमध्ये जमा होईल पुढील हप्ता –
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रूपये दिले जातात.
ही रक्कम 2 हजार च्या तीन हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.
आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते जमा करण्यात आले आहेत.
सातवा हप्ता हा डिसेंबर मध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
⭕चूका दुरूस्त करण्याची संधी….
या योजनेत अनेक शेतकरी आहेत ज्यांना यापूर्वीचा हप्ता मिळालेला नाही.
आधार नंबर भरताना झालेली चूक, नावात झालेली चूक यामुळे नोंदणी रद्द झाली आहे.
⭕ऑनलाइन दुरूस्त करा चुका…..
ज्यांच्या आधार नंबर किंवा नावात चूका झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने त्यांना चूका दुरूस्त करण्यासाठी संधी दिली आहे.
यासाठी तुम्हाला पी.एम. किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल.
शेतकरी घरी बसून अर्जाशी संबंधित कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू शकतात.
ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.
चूका दुरूस्त करण्याची पद्धत पुढील प्रमाणे..
1). पंतप्रधान किसान सन्मान निधि योजनेची वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
2). वेबसाईटवर तुम्हाला उजव्या बाजूला शेतकरी काॅर्नर दिसेल, त्यावर क्लिक करा.
3). येथे तुम्हाला अनेक प्रकारचे पर्याय दिसतील.
4). येथे तुम्ही तुमचे डाॅक्यूमेंट्स अपलोड करू शकता.
5). जर आधार, नावाचे स्पेलिंग, अकाउंट नंबर दुरूस्त करायचा असेल तर हेल्पडेस्क वर क्लिक करा.
6). येथे अर्जात नोंदलेल्या चुका दुरूस्त करून सबमिट करा.
7). जर कोणतीही अधिक माहिती पाहिजे असेल तर हेल्पलाईन – 011-24300606 वर काॅल करू शकता.