Breaking News

“मीच माझा बूथ प्रमुख” या संकल्पनेतून आगामी निवडणुकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस सामोरे जाणार – अंबादास खैरे

नाशिक (दि.३) – प्रत्येक प्रभागातील युवक पदाधिकारी स्थानिक नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवून आगामी महानगरपालिका निवडणुक काबीज करण्यासाठी “मीच माझा बूथ प्रमुख” या संकल्पनेतून प्रभावी कार्य करणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. यावेळी शिवराज ओबेरॉय, डॉ.संदीप चव्हाण, जय कोतवाल, बाळा निगळ, मुकेश शेवाळे, निलेश भंदुरे, सत्यम पोतदार, रामदास मेदगे, राहुल कमानकर आदि मंचावर उपस्थित होते.
नागरिकांच्या विविध अडचणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सोडविल्या जात असून युवकांमध्ये राष्ट्रवादी पार्टीची प्रतिमा उजळून निघत आहे. त्यामुळे सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आकर्षित होत आहे. राष्ट्रवादी पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने त्याचा जनहितार्थ फायदा करून घेण्यासाठी (दि.३) राष्ट्रवादी भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. नाशिक शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या विविध समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी प्राधान्य देणार आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक प्रभागात वार्ड निहाय अध्यक्ष नेमण्यात येणार आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस आधी तयारीला लागली असून वार्ड अध्यक्ष राहत असलेल्या बूथ वर “मीच माझा बूथ प्रमुख” हि संकल्पना राबविणार आहे. याचा फायदा महानगरपालिका निवडणूकीसाठी होणार आहे. कोरोना बाधितांवर उपचार करताना रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारली जात होती. यावर अंकुश घालण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हेल्पलाईन नंबर जाहीर करून अनेक कुटुंबाला आर्थिक झळ बसण्यापासून रोखले. तसेच राज्य सरकारने आणलेल्या शासकीय योजना व त्या योजनेचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जनहितार्थ केलेले कार्य नाशिक शहरातील इतर जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी युवक पदाधिकाऱ्यांची यंत्रणा कमी पडत असून ती अधिक भक्कम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत युवा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने आगामी निवडणुकीत युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्याचा फायदा करून घेण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचून त्यांचा समस्या तातडीने सोडवून त्यांची प्रसिद्धी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन आणखी मजबूत करून आगामी निवडणुकांना समोरे जावे. याकरिता तीन विधानसभा व सहा विभागाला प्रत्येकी एक निरीक्षक नेमण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी या बैठकीत सांगितले.
याप्रसंगी किरण पानकर, नवराज रामराजे, निलेश सानप, संतोष भुजबळ, संतोष जगताप, हर्षल चव्हाण, मनोज चव्हाण, विक्रांत डहाळे, प्रशांत नवले, रियान शेख, सचिन मोगल, अभिमन्यू गुडघे-पाटील, राहुल पाठक, सुनील घुगे, सिद्धार्थ सांगळे, सागर शेजवळ, भूषण गायकवाड, करण आरोटे, तुषार दिवे, कल्पेश कांडेकर, अविनाश मालुंजकर, अक्षय परदेशी, स्वप्निल चुंभळे, अनिकेत वझरे, किरण सूर्यवंशी, अभिषेक सराफ, प्रणव पानकर, गणेश गरगटे, सागर शेजवळ, मिलिंद सोळंकी, प्रतिक यलूरकर, जेम्स फर्नांडिस, सिद्धार्थ सांगळे, अतिक शेख, सोनू कागडा, सनी रॉय, निशांत गोसावी, अथर्व गीते, हिमांशू गायकवाड, शादाब सय्यद, विलास सोनवणे, वासिम सय्यद, अथर्व खांडगे, ओमकार बंद्रे, दीपक कुलकर्णी, संजय मोरे, सागर चव्हाण, प्रतिक बनकर, गौरव पाटील, रितेश जाधव, कृष्णा जाधव, दिग्विजय थोरात, शरद ठाकूर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.