Breaking News

राज्यातील कंटेनमेंट झोन बाहेरील सिनेमगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स आजपासून सुरू

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मुंबई : देशात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. महाराष्ट्रातही बरीच कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स बंद होते. राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने शिथिलीकरण केले असले तरीही प्रार्थनास्थळे, सिनेमागृहे, शाळा, उद्याने यांच्यावरील बंदी कायम होती. दरम्यान बुधवारी राज्य सरकारने शिथिलीकरणासंदर्भात नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार गुरुवार ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्स ५0 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
मात्र नाट्यगृहे, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून देण्यात आलेले सर्व नियम पाळणे बंधनकारक राहणार आहेत. तसेच बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश या इनडोअर खेळांसह इनडोअर शूटिंग रेंज सुरू करण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कंटेन्मेंट झोनमधील जलतरण तलाव बंदच राहणार आहेत. कोरोनाचे नियम पाळून हे सर्व सुरु करावे लागणार आहे. योगा अभ्यास केंद्रांनाही परवानगी दिली आहे.
दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना ही संमती देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रे अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहें, शाळा सगळे बंद करण्यात आले होते. आता अनलॉकच्या पार्श्‍वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.
थिएटर्स सुरु करण्यात येणार असले तरीही कोरोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. अनलॉक ५ मध्ये ठाकरे सरकारने हॉटेल आणि रेस्तराँ ५0 टक्के क्षमतेसह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे गुरुवारपासून उघडणार आहेत. त्यामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.