Breaking News

जुगारात जिंकलेल्या पैशांच्या वादातून खून ; आठ वर्षांनंतर माथाडी कामगाराच्या हत्येचा उलगडा…….

प्रतिनिधी- युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज

नवी मुंबई : आठ वर्षांपूर्वी झालेल्या माथाडी कामगाराच्या हत्येचा उलगडा करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश आले आहे.
जुगारात जिंकलेल्या पैशाच्या वादातून आरोपीने केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी दोन वेळा तपास बंद केल्यानंतर तिसऱ्यांदा आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दशरथ विठ्ठल कांबळे असे अटक आरोपीचे नाव आहे.
२९ डिसेंबर २०१२ रोजी तुर्भे येथील एस.टी.  स्थानकाजवळ निर्जनस्थळी एक मृतदेह आढळून आला होता.
पोलिसांना त्याच्याकडे काही वस्तू आढळून आल्याने त्याची ओळख पटली होती.
आनंदा बाबुराव सुकाळे असे मयत व्यक्तीचे नाव होते.
शवविच्छेदनमध्ये त्याच्या डोक्यावर जड वस्तू मारल्याने रक्तस्राावाने त्याचा मृत्यू झाल्याचे निदान झाले होते.
मात्र या प्रकरणी आरोपीचा शोध लागत नव्हता.
१७ ऑगस्ट २०१३ मध्ये तपास बंद करण्यात आला.
त्यानंतर पुन्हा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला, मात्र काहीही हाती न लागल्याने फेब्रुवारी २०१७ मध्ये पुन्हा तपास थांबवण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. बीजी शेखर पाटील यांनी आव्हान म्हणून हा तपास सुरू केला होता.
यासाठी उपायुक्त प्रवीण कुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, गिरीधर गोरे , साहाय्य्क पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे पथक नेमण्यात आले होते.
तपासात आरोपी कांबळे याच्याबाबत काही माहिती हाती आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा कबुल केला.
ए.पी.एम.सी. परिसरात आरोपी कांबळे याची माथाडी कामगारांत दहशद असल्याचे समोर आले होते.
त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *