Breaking News

कर्तव्य बजावणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसाला गाडीच्या बोनेटवर बसवून फिरवलं……..

मुजोरीचा कळस,

कर्तव्य बजावणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रन शाखेचे पोलीस कर्मचारी आबासाहेब सावंत यांना गाडीच्या बोनेटवर बसवून फिरवलं……..

शिवशक्ती टाइम्स न्यूज

पिंपरी-चिंचवड : कर्तव्य बजावणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसाला पिंपरी-चिंचवडमध्ये एका कार चालकाने गाडीच्या बोनेटवर बसवून एक किलोमिटरपर्यंत फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
संध्याकाळी चिंचवड चौकात हा धक्कादायक प्रकार घडला.
हा प्रकार घडत असताना शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस, रस्त्यावरील नागरिक या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते.
परंतू हा वाहनचालक कोणत्याही प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
आबासाहेब सावंत असं या शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून या प्रकारात सावंत यांच्या गुडघ्याला जखम झाली आहे.
तर सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली युवराज किसन हनवते याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर वाहतूक नियंत्रन शाखेचे पोलीस कर्मचारी आबासाहेब सावंत हे चिंचवड एलप्रोज चौकात आपलं कर्तव्य बजावत होते.
विनामास्क घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करत होते.
यादरम्यान मोटार चालक आरोपी युवराज हा त्या भागातून जात असताना सावंत यांनी त्याला थांबण्यास सांगितलं.
मात्र सावंत यांच्याकडे दुर्लक्ष करत आरोपी युवराजने मोटार पुढे नेली.
मोटार थांबवण्यासाठी पोलीस कर्मचारी सावंत गाडीच्या समोर येऊन उभे राहिले आणि युवराज यांना खाली उतरण्यास सांगितलं.
मात्र आरोपी युवराजने यावेळी काहीही न ऐकता सावंत यांच्या अंगावर गाडी घालून धूम स्टाईलने भरधाव वेगात गाडी पुढे नेली.
पोलीस कर्मचारी सावंत यांनी आपला जीव वाचवण्यासाठी गाडीच्या बोनेटला पकडून राहिले.
गाडी थांबवण्याची वारंवार विनंती करत असतानाही युवराजने गाडी थांबवली नाही.
हा सर्व प्रकार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हा प्रकार घडत असतान रस्त्यावरील नागरिकांनीही आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला.

About Shivshakti Times

Check Also

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! याच महिन्यात सुरू होतेय बहुप्रतिक्षित सेवा,

प्रवासात अजिबात नाही येणार कंटाळा……. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली …

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक ; परीक्षा रद्द……

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक ; ⭕ परीक्षा रद्द…… शिवशक्ती टाइम्स न्यूज’ प्रतिनिधी …

सर्वसामान्यांना पुन्हा झटका,…घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या……

सर्वसामान्यांना पुन्हा झटका, ⭕चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या…… शिवशक्ती टाइम्स न्यूज’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *