Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, यशपाल भिंगे यांची नाव जवळपास निश्चित

BRAKING NEWS महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 नावांची शिफारस आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे केली.

शिवशक्ती टाइम्स न्यूज  (प्रतिनिधी – युसूफ पठाण )

मुंबई: विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे सोपवण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगेंना संधी दिल्याची माहिती आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना सहकार आणि समाजसेवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सहकार आणि सेवा, गायक आनंद शिंदे यांना कला आणि यशपाल भिंगे यांना साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे. (NCP nominates Eknath Khadase, Raju Shetti, Yashpal Bhinge, Anand Shinde)

आज संध्याकाळी 6च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवनह मंत्री अनिल परब आणि अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली. त्यानंतर या तिघांनीही राज्यपालांशी काहीवेळ चर्चा केली.

*आनंद शिंदे* हे प्रसिद्ध गायक असून महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाय ते दलित समाजातून आले आहेत. विशेषत: ते रिपब्लिकन चळवळीतही सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन दलितांची मते वळवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे मानले जातेय. राज्यात प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने मोठी राजकीय शक्ती निर्माण केली आहे. त्यामुळे वंचितची ही मते आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे यांचा उपयोग करून घेण्यावर राष्ट्रवादीचा भर असेल असं बोललं जात आहे.

यशपाल भिंगे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीकडून 2019 ची लोकसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध लढवली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं साहित्य क्षेत्रातून संधी दिली आहे.

तसेच

*भारतीय राष्ट्रीय काँग्रेस*
रजनी पाटील
सचिन सावंत
मुझफ्फर हुसेन
अनिरुद्ध वनकर

*शिवसेना*
उर्मिला मातोंडकर
चंद्रकांत रघुवंशी
विजय करंजकर
नितीन बानगुडे पाटील

यांची नावे चर्चेत आहेत.

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *