Breaking News

चित्रपट निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त; एन.सी.बी.ची कारवाई……

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एन.सी.बी.) मुंबई आणि परिसरात पाच ठिकाणी छापे टाकले आहेत.
या छाप्यांदरम्यान बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले.
ड्रग्जप्रकरणी फिरोज व त्यांच्या पत्नीची एन.सी.बी.कडून चौकशी सुरू आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त दिलं आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज अँगलनंतर एन.सी.बी.ने सुरु केलेली कारवाई अद्यापही सुरुच आहे.
फिरोज यांच्या घरी एन.सी.बी.ने केलेल्या कारवाईअंतर्गत १० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एन.सी.बी.ने मुंबईत पाच ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
यामध्ये मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैराणे या भागांचा समावेश आहे.

About Shivshakti Times

Check Also

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न

कोरोना नियमांचे पालन करून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न शिवशक्ती टाइम्स न्यूज …

राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबणीवर

राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही राज्यात लसीकरण सुरु करण्यासाठी पुरेसा लसी उपलब्ध …

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांना मोफत बियाणे, खते वाटप

मालेगाव तालुका ॲग्रो डिलर्स असोसिएशनच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा उपक्रम स्तुत्य : कृषी मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *