शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण
उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस अधिकच वाढत आहेत.
आता येथील बलिया जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक व संतपाजनक अशी घटना घडली आहे.
छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या एका विद्यार्थीनीस जाळण्यात आल्याचे समोर आले आहे.
तर, आपली मुलगी आगीत सापडल्याचे पाहून तिला वाचवण्यास गेलेले या मुलीचे वडील देखील भाजले गेले आहेत.
सध्या जखमी विद्यार्थीनीस वाराणसी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
बलियामधील दुबहड ठाणे परिसरातील नगवा गावात ही घटना घडली आहे.
शिकणीसाठी निघालेल्या विद्यार्थीनीची गाव गुंडांनी छेड काढण्यास सुरूवात केली.
ज्याचा तिने विरोध केला.
यामुळे संतप्त झालेल्या गुंडांनी नंतर तिच्या घरात घुसून तिला जिवंत जाळले.
दरम्यान, मुलीस वाचवण्यास गेलेले तिचे वडील देखील गंभीर भाजले गेले.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गंभीर भाजलेल्या अवस्थेत पीडित विद्यार्थीनीस रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर, आता तिचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे.
तिच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मागील काही दिवसांपासून तिला एक तरूण सातत्याने त्रास देत होता.
शिवाय, त्याचे म्हणने न ऐकल्यास तिचे आयुष्य उद्धवस्त करण्याची देखील धमकी देत होता.
नातेवाईकांनी आरोप केला आहे की, या तरूणाने घरातू घुसून अखेर तिला जिवंत जाळले.
या अगोदर बलियाचा शेजारील जिल्हा असलेल्या देवरिया येथे छेडछाडीस विरोध करणाऱ्या मुलीच्या वडिलांची मारहाण करून हत्या करण्यात आली होती.
तरुणीच्या छेडछाडीची घटना ; विरोध करणाऱ्या वडिलांची आरोपींनी केली हत्या !
हाथरसमध्ये घडलेल्या अमानुष प्रकरणानंतर उत्तर प्रदेशात गुंडाराज ऐरणीवर आला आहे.
याबाबत आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.
आपल्या मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या बापाला छेडछाड करणाऱ्या गुंडांनी बेदम मारहाण करुन ठार मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
येथील देवरिया जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
ए.एन.आय.च्या वृत्तानुसार, पीडित मुलीची त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने छेड काढली होती.
यामुळे रागावलेल्या मुलीच्या वडिलांनी छेड काढणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लगावली होती.
यानंतर रागाने पेटलेल्या या आरोपी तरुणाने काही लोकांना घेऊन त्या मुलीच्या घरी पोहोचला.
या लोकांकडे हत्यारं होती.
घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांना लाथा-बुक्क्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाणीमुळे गंभीररित्या जखमी झालेल्या वडिलांनी आपले प्राण सोडले.
याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.
या घटनेनंतर मुलीच्या गावात प्रचंड तणावाची स्थिती आहे.
पोलिसांनी याप्रकरणी ६ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यांपैकी तीन जण प्रसिद्ध व्यक्ती आहेत.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार या गुंडांनी संध्याकाळी पीडित मुलीची छेड काढली.
याबाबत मुलीच्या वडिलांनी आरोपी मुलाकडे तक्रार केली मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केले आणि मुलीच्या वडिलांसोबतच भांडायला लागला.
त्यानंतर चिडलेल्या मुलीच्या वडिलांनी त्याला थप्पड लगावली.
यानंतर चवताळलेल्या आरोपी तरुणाने आपल्या सहकार्यांसह मुलीच्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.