Breaking News

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, मारहाणीत पत्नीचे दातच पाडले……..

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला,
⭕मारहाणीत पत्नीचे दातच पाडले……..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण

घरात अनेकदा बायको आणि नवऱ्यात छोट्या छोट्या कारणांवरुन भांडण होत असतं.
परंतु पुण्यात पत्नीने मटण बनवण्यासाठी दीड तास लागेल असं सांगितल्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला मारहाण करत तिचे दात पाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभाकरन नाडार असं आरोपी पतीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध परिसरात प्रभाकरन नाडार हे आपल्या पत्नी सोबत राहतात.
आरोपी प्रभाकरन हा दारू पिऊन घरी मटण घेऊन आला होता.
त्यावेळी त्याने पत्नीला मटण बनवून दे, असे सांगितले. त्यावर पत्नी म्हणाली की, माझ्या हातात दुसरे काम असून त्यामुळे मटण तयार करण्यासाठी दीड तास लागेल.
यावर संतापलेल्या प्रभाकरने एवढा वेळ कशासाठी लागेल असं विचारलं असता पत्नीने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नसल्याने प्रभाकरनला राग आला.
या रागातून त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली.
या मारहाणीत पत्नीचे दात पडल्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी पती प्रभाकरन नाडार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

About Shivshakti Times

Check Also

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहुन शेतकऱ्याची आत्महत्या, पोलीस अन् व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमुद

शिवशक्ती टाइम्स न्यूज  प्रतिनिधी युसूफ पठाण अमरावती : संत्र्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याने केलेली फसवणूक व त्यापाठोपाठ …

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. …

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

Leave a Reply

Your email address will not be published.