Breaking News

आयुक्त त्रंबक कासार यांनी दिवाळीसाठी दिली गोड बातमी : ठोक मानधन तत्वावर 1006 पदांची भरती.

मालेगाव महानगरपालिकेच्या विविध विभागातील कामांचा त्वरेने निपटारा होणे कामी तसेच कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता निव्वळ
फक्त सहा महिन्याचा विशिष्ट कालावधी करीता विविध 44 संवर्गातील 1006 पदांची थेट मुलाखती (walk in interview) पध्दतीने निव्वळ ठोक तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर भरणे कामी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. शैक्षणिक पात्राताधारक इच्छुक उमेदवारांनी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील तक्त्यात नमुद प्रमाणे विशिष्ट दिनांक व वेळेस कॉन्फ्रन्स हॉल 1 ला, मजला, जुनी इमारत, महानगरपिालका मुख्यालय, भुईकोट किल्ला समोर, रविवार वार्ड, मालेगाव (४२३२०३) या ठिकाणी उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात येत असून, सदर मुलाखती दरम्यान मास्कचा वापर तसेच सामाजिक अंतर राखणे या सारख्या कोविड-१९ प्रतिबंधक एकुण मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे उमेदवारांना बंधनकारक राहील.

सदरचे पदे हे फक्त सहा महिन्या करीता कामाच्या निपटारा करणेसाठी असून सदरची भरती ही कायम पदांची नाही. याची काळजीपुर्वक सर्वांनी नोंद घ्यावी.
१) सदरची पदे कमाल निव्वळ ६ महिने कालावधीकरीता ठोक मानधन स्वरुपाची असल्याने मुदत संपातच ठोक मानधन तत्वावरील नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल या बाबातीत कोणतेही स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार नाही.
२) भरती प्रक्रियेचे संपुर्ण अधिकार, पदे कमी-जास्त करणे, भरती प्रक्रिय कोणत्याही टप्प्यावर रद्द/स्थागित करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे व इतर सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असून निवड
प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार तसेच मानधन कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार मा.आयुक्त मनपा,मालेगाव यांनी राखुन ठेवला आहे.
३) उमेदवारांची निवड करतांना किमान शैक्षणिक पात्रता जाहिरतीच्या सुचनामधील नमुद रकाना ४ प्रमाणे असणे आवश्यक राहील.तसेच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये व कोव्हीड-१९ च्या काळात प्रत्यक्ष काम केलेल्या अनुभवी व स्थानिक
उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
४) उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची छाननी अंती फक्त पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. याची नोंद घ्यावी.अपात्र उमेदवारांचा मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.
५) सदरची पदे ही विशिष्ट कालावधी करीता व ठोक मानधन तत्वावर फक्त कामांचा निपटारा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याने सदर पदाचा कायमपणाचे कोणतेही फायदे अनुज्ञेय रहाणार नाहीत व त्यावर दावा करता येणार नाही, याची काळजीपुर्वक नोंद घ्यावी.
६) प्रस्तुत मानधन भरती प्रक्रिया ही पारदर्शक होणार असल्याने या संदर्भात कोणत्याही गैरप्रकाराला बळी पडु नये.
७) सदर मानधन भरती प्रक्रिया अंतर्गत होणाऱ्या नियुक्ती मिळणे कामी कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव आणल्याचे निदर्शनासा आल्यास परिणामस्वरुप संबंधित उमेदवारास भरती प्रक्रियातुन बाद करण्यात येईल, याची गांभीर्यपुर्वक नोंद घ्यावी. संबंधीत इच्छुक उमेदवारांनी ज्या पदासाठी मुलाखत द्याव्याची आहे या करीता प्रसिध्द केलेल्या जाहिरातीतल एकुण बाबी परिपुर्ण व काळजीपुर्वक वाचुनच अर्ज सादर करण्याचे करावे.

(दत्तात्रय पी. काथेपुरी)
जनसंपर्क अधिकारी
मालेगाव महानगरपालिका मालेगाव.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.