Breaking News

*मालेगाव महापालिकेत फोन पे द्वारे घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचा शुभारंभ*

*नागरिकांना घरी बसून महापालिकेची घरपट्टी पाणीपट्टी भरता येणार: महापौर ताहेरा रशीद शेख*. शिवशक्ती टाईम्स न्युज

मालेगाव महानगरपालिकेत महापौर ताहेरा रशीद शेख आयुक्त त्रंबक कासार यांच्या हस्ते व उपमहापौर निलेश आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंगळवार, दि.10/11/2020, रोजी दुपारी आयुक्त यांचे सभागृहात घरपट्टी व पाणीपट्टी देयके फोन पे द्वारे ऑनलाईन भरणे चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर ताहेरा रशीद शेख म्हणाल्या की फोन पे द्वारे ऑनलाइन घरपट्टी पाणीपट्टी सुविधा उपलब्ध करून देणारी मालेगाव महानगरपालिका महाराष्ट्रातील ड वर्गातील पहिली महापालिका आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून पैसे मोजणे, गर्दीत जाउन नंबर लावून भरणा करणे, अशा कोरोना महामारीतील मार्गदर्शक सूचनाचे पालन करण्यासाठी ही नागरिकांना मदत होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन घरी बसून महापालिकेची पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Covid-19 कोरोना कालावधीत सावरतांना महापालिकेद्वारे नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी घरपट्टी व पाणीपट्टी देयके फोन पे द्वारे ऑनलाईन भरता येणार असून घरपट्टी पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना पुढील वर्षापासून महापालिकेत किंवा प्रभाग कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. पुढील वर्षापासून नागरिकांना मिळणाऱ्या घरपट्टी देयकवरच क्यू आर कोड देण्यात येणार असून त्याद्वारे नागरिक घरबसल्या घरपट्टी पाणीपट्टी देयके अदा करू शकतील. सद्यस्थितीत घरपट्टी देयके नागरिकांना देण्यात आली असल्याने महापालिकेचे येणारे कर्मचाऱ्यांकडून क्यूआर कोड मार्फत तसेच महापालिकेच्या संबंधित प्रभाग कार्यालयात जाऊन क्यू आर कोड द्वारे आपणास घरपट्टी व पाणीपट्टी देयकांची पैसे भरण्याची सुविधा करण्यात आली आहे.

*मालेगाव महापालिकेची कोरोना कालावधीत नागरिकांसाठी नवीन सुविधा : आयुक्त त्रंबक कासार*

यावेळी आयुक्त म्हणाले की, ऑनलाईन पाणीपट्टी घरपट्टी भरणे हा मालेगाव पॅटर्नचा एक भाग असून त्यामुळे सोशल डिस्टंसिंग चे पालन होणार आहे, फोन पे ही डिजिटल पेमेंट ची सुविधा असून कॉरोना कालावधीत नागरिकांना याचा चांगला उपयोग होणार आहे, अशी सुविधा उपलब्ध करून देणारी उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव महापालिका ही राज्यातील पहिली ड वर्ग महापालिका आहे. पुणे महानगरपालिका, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका, वसई- विरार महानगरपालिका यानंतर मालेगाव महापालिकेने नागरिकांना फोन पे ॲप द्वारे घर बसले मनपाची देयके भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी केलेल्या पेमेंटची त्वरित संबंधित प्रभाग अधिकारी व संगणक विभागात नोंद होणार असून नागरिकांच्या मोबाईल वर संदेश प्राप्त होणार आहे. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी श्री तोसिफ शेख, यांची प्रभाग क्रमांक तीन मधील घराची रुपये 2355 पाणीपट्टी व संगणक विभागाचे मानधन कर्मचारी उमाकांत पाटील यांची प्रभाग क्रमांक 1 मधील घराची घरपट्टी देयके प्रथम फोन पे द्वारे भरून शुभारंभ केला.

शुभारंभप्रसंगी उपमहापौर निलेश दादा आहेर व स्थाई समिती सभापती यांनी नागरिकांना घरपट्टी पाणीपट्टी पे फोन द्वारे ऑनलाईन भरण्याबाबत आवाहन केले. उक्त कार्यवाहीसाठी संगणक विभाग प्रमुख सचिन महाले व त्यांच्या चमूने श्रम घेतले.
ऑनलाइन शुभारंभप्रसंगी महापौर ताहेरा रशीद शेख, आयुक्त त्रंबक कासार, उपमहापौर निलेश आहेर, उपायुक्त नितीन कापडणीस, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, सहा. आयुक्त राहुल मर्ढेकर, तुषार आहेर, वैभव लोंढे, नगरसेवक नंदकुमार सावंत, प्रभाग अधिकारी हरीष डिंबर ,पंकज सोनवणे, शाम बुरकुल, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, फोन पे गोकुळ विभांडिक व भारत कचवे, मनपाच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जनसंपर्क अधिकारी,
जनसंपर्क विभाग मनपा मालेगाव.

About Shivshakti Times

Check Also

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद

मालेगावात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार जेरबंद तीन देशी बनावटीचे पिस्टल व सात जिवंत काडतुसे हस्तगत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *