Breaking News

जन्मदाखला प्रकरणातील ठोक मानधन तत्वावरील कर्मचारीची सेवा तत्काळ प्रभावाने रद्द. : आयुक्त त्रंबक कासार

शिवशक्ती टाइम्स न्यूज


आयेशा नगर पोलीस ठाणे यांचे जा.क्र.१३९१/२०२० दिनांक ६ नोव्हेंबर २०२० च्या पत्रानुसार आयशानगर पोलीस ठाणे I गु.र.नं ३६/२०२० भादविक ४२०,४६१, ४६६,४६८,४७३,३४, पासपोर्ट कायदा कलम १२(ब)प्रमाणे व कलम नियम ०३ सह ०६ पारपत्र (भारतात प्रवेश ) १९५०, परिच्छेद ३(१)परकीय नागरिक आदेश १९४८,परकिय नागरिक कायदा १९४६ कलम १४,२(रिपोर्ट टु पोलीस) रुल २००१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्ह्यातील आरोपी नामे आलम अमिन अन्सारी वय ३८ वर्षे, राह- हजार खोली, घर नं.९४२, गल्ली नं.०२, मालेगांव याचे ताब्यातुन त्याचा जन्म दाखला जप्त करण्यात आला असुन सदरचा जन्म प्रभाग कार्यालय क्रमांक 4 मधील जन्म-मृत्यू विभागात तत्कालीन संगणक चालक मानधन कर्मचारी व सद्यस्थितीतील गॅरेज विभागातील मानधन वाहनचालक ललित नाना मराठे राहणार कैलास नगर मालेगाव कार्यरत होता. त्याने बोगस दाखले बनवले असल्याचा पोलिसांना संशय असल्याने त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. करीता मनपा आस्था.जा.क्र.४८/२०२०, दि.०६/०१/२०२० रोजीचे आदेशातील अट क्र.०८ व क्र.१३ इत्यादीचे उल्लंघन केलेले असल्याने ललित नाना मराठे ठोक मानधन तत्वावरील वाहन चालक म्हणून दिलेली मानधन वरील तात्पुरती नियुक्ती तात्काळ पुर्वलक्षी प्रभावाने दिनांक ०६/११/२०२० पासून रद्द करण्यात आली आहे. प्रकरणी यापुढे कोणीही मनपाच्या हिताविरुद्ध कामात दोषी आढळणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच जन्म मृत्यू प्रकरणी सर्व दस्तऐवज यांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. असे आयुक्त कासार यांनी सांगितले.

About Shivshakti Times

Check Also

मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार -सांस्कृत‍िक कार्य मंत्री अमित देशमुख

मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ …

नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद

*नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलमधून दीड वर्षांचे बाळ पळविले; भामटा सीसीटीव्हीत कैद !*  शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी …

स्वत:चा सख्खा भाऊ १२ वर्षे राज्याचा गृहमंत्री असतानाही…;

आर. आर. पाटलांच्या भावाचं अजित पवारांकडून कौतुक…. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *