Breaking News

पोटनिवडणुकांमध्ये 6 राज्यांत भाजपची बाजी; मध्यप्रदेशात 28 पैकी 19 जागा जिंकत सरकार मजबूत

शिवशक्ती टाइम्स न्यूज  (प्रतिनिधी – युसूफ पठाण)

पोटनिवडणुकांमध्ये 6 राज्यांत भाजपची बाजी; मध्यप्रदेशात 28 पैकी 19 जागा जिंकत सरकार मजबूत

देशातील 11 राज्यांमधील 58 विधानसभा जागा आणि बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी 3 आणि 7 नोव्हेंबर रोजी पोट निवडणूका घेण्यात आल्या होत्या. काल बिहार विधानसभा निवडणुकांसोबतच या पोटनिवडणुकांचेही निकाल जाहीर करण्यात आले.

💁🏻‍♂️ मध्य प्रदेशात 28 जागांवर घेण्यात आलेल्या पोट निवडणूकांमध्ये रिंगणात उतरलेल्या 12 मंत्र्यांपैकी 3 मंत्र्यांना निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागत आहे, तर 9 मंत्री निवडणूकीत विजयी झाले. या पोट निवडणुकांमध्ये मध्यप्रदेशात 28 जागांपैकी 19 जागांवर भाजपने बाजी मारली आहे.

🧐 पोटनिवडणुकांच्या निकालांनुसार,

▪️ मध्य प्रदेश सरकारमधील ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक इमरती देवी डबरा 7,633 मतांनी आणि गिर्राज दंडोतिया दिमनी 26,467 मतांनी निवडणूकीत पराभूत झाले. याव्यतिरिक्त एक दुसरे मंत्री एदल सिंह कंषाना यांचा सुमावली येथून 10,947 मतांनी पराभव झाला.

▪️ राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच 230 सदस्यांच्या विधानसभेच्या 28 जागांसाठी एकत्रच पोटनिवडणूका घेतल्या गेल्या. या निवडणुकांमध्ये मध्यप्रदेशातील 12 मंत्र्यांसह एकूण 355 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते.

✊ पोटनिवडणुकांमध्येही भाजपचेच वर्चस्व-

▪️ गुजरात : 8 पैकी 8 जागांवर भाजप विजयी
▪️ मध्य प्रदेश : 28 पैकी 19 जागांवर भाजप विजयी
▪️ कर्नाटक : दोन्ही जांगावर भाजपची बाजी
▪️ उत्तरप्रदेश : 7 पैकी 5 जागावर भाजप विजयी
▪️ तेलंगणा : भाजपचा विजय
▪️ मणिपूर : 5 पैकी 4 जागांवर भाजपची सत्ता

About Shivshakti Times

Check Also

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची एकमेकांना धडक होऊन भीषण अपघात; ⭕ पाच जणांचा मृत्यू…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. वाहनांनी एकमेकांना …

आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच जुळवलं सूत, आता जामिनावर लग्नही करणार……

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण जयपूर : लाच घेतल्याचा आरोप आणि त्यासाठी शिक्षा झालेली …

मालोजी राजे गढीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणार -सांस्कृत‍िक कार्य मंत्री अमित देशमुख

मालोजी राजे भोसले गढी दुरूस्ती व संवर्धनाबाबत आढावा बैठक शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *