Breaking News

पोलिसांसाठीच्या घरांनाही मागणी कमी;

४४६६ घरांसाठी सिडकोकडे ३९७५ अर्ज…….

शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी – युसूफ पठाण

नवी मुंबई : मागील दोन वर्षांत सिडकोने काढलेल्या २४ हजार घरांच्या सोडतीकडे जवळपास सात हजार सर्वसामान्य ग्राहकांचा प्रतिसाद कमी होत असताना आता मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील पोलिसांसाठी चार हजार ४६६ घरांच्या सोडतीसाठी ४९१ पोलिसांनी नकार दिला आहे.
त्यामुळे घरे जास्त आणि मागणी कमी असे विरोधाभासी चित्र सिडकोत पहिल्यांदाच पाहण्यास मिळाले आहे.
सिडकोच्या महागृहनिर्मितीतील घरे विकली जात नाहीत किंवा अर्ज अपात्र ठरत असल्याचे चिंतन सध्या सिडको प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याने दोन लाख घरांच्या संकल्पाऐवजी त्यात कपात करून आता केवळ ९५ हजार घरे तयार करून ती विकली जाणार असल्याचे समजते.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.) क्षेत्रातील अनेक पोलिसांना घरे नाहीत.
यातील बहुतांशी पोलीस भाडय़ाने राहात असून काहीजणांना पोलीस दलाकडून घरे देण्यात आली आहेत.
मात्र निवृत्तीनंतर ही घरे खाली करावी लागत आहेत.
त्यामुळे अनेक वर्षे मुंबई महानगर प्रदेशात सेवा करूनही घर नसलेले शेकडो पोलीस आहेत.
सिडकोने सध्या महागृहनिर्मितीचा धडाका लावला आहे.
केंद्र सरकारच्या सर्वासाठी घरे या योजनेअंर्तगत सिडकोने दोन लाख घरे बांधण्याचे जाहीर केले होते.
मात्र अलीकडे सिडकोच्या सोडतीत अनेक ग्राहक अपात्र ठरत असल्याने घरे शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढले आहे.
हे प्रमाण सात हजारांच्या घरात असून सोडतीत घर लागून एकही हप्ता न भरणाऱ्या ग्राहकांची संख्या दोन हजारांपर्यंत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेनंतर काही काळ गृहमंत्री असलेले विद्यमान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी उचलून धरली.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.