प्रतिनिधी – युसूफ पठाण
(शिवशक्ती टाइम्स न्यूज)
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना अंतरिम जामीन देण्यात आला आहे.
✅ सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी यांना 50 हजारांच्या हमीवर अंतरिम जामीन मंजूर केला. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रायगड पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
🧐 अर्णवसह नीतिश सारडा आणि फिरोझ शेख यांनाही सुप्रीम कोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
📌 आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवले. मुंबई हायकोर्ट व्यक्तीच्या स्वातंत्र्यांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले, असंही निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं.
⏹️ हरीश साळवे यांनी अर्णव गोस्वामींविरुद्ध सूड भावनेने कारवाई होत असल्याचेही न्यायालयात सांगितले. महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या चर्चेचा आणि इतर प्रकरणांचा दाखला साळवेंनी दिला.
➖➖➖➖➖➖➖➖➖