Breaking News

 नगरसेविका तुळसाबाई साबणे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

नगरसेविका तुळसाबाई साबणे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा*

मालेगाव  प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका तुळसाबाई साबणे यांनी  जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करुन साजरी करुया, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करुन त्यांनाही दिवाळी आनंदात सहभागी करुन घेण्याची परंपरा यावर्षीही कायम राखूया, असं आवाहन नगरसेविका तुळसाबाई साबणे यांनी केलं आहे.

नगरसेवक प्रतिनिधी  दिनेश भाऊ साबणे  व अर्जुन आप्पा साबणे  हे दिवाळीच्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा सण. दिवाळीनिमित्त घराघरात लागलेल्या दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-प्रथा-परंपरांचा अंधारही आपल्या जीवनातून दूर करण्याचा प्रयत्न करुया. आपलं राज्य सध्या कोरोना संकटाशी लढत आहे. ही लढाई लवकर जिंकायची असेल तर सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं पाहिजे. मास्क लावणं, गर्दी टाळणं, वारंवार हात धुत रहाणं, यासारखी दक्षता घेऊन प्रत्येकानं स्वत:ला, कुटुंबाला व समाजाला सुरक्षित ठेवण्यात योगदान द्यावं. दिवाळी सणाच्या काळात कोरोना आणि प्रदूषण वाढणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन साबणे यांनी केलं आहे.
००००००

About Shivshakti Times

Check Also

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप

भाईजी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे मालेगांव येथे रुग्णांना अन्नदान व पाणी बॉटल वाटप मालेगाव – …

मालेगाव शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलिस प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन

विना मास्क फ़िरणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल 14 दिवस होम आयसोलेट व्यक्ती बाहेर फिरताना …

नाशिक मनपा व क्रेडाईच्या ठक्कर डोम येथील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वित

*शेवटचा रुग्ण बरा होत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची ही लढाई संपणार नाही-पालकमंत्री छगन भुजबळ* शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *