❇️ *पोस्टमनमार्फत दारातच डिजिटल जीवन प्रमाणपत्र जमा करून घेण्यासाठी IPPBचा उपक्रम*
प्रतिनिधी युसुफ पठाण
12 नोव्हेंबर 2020 रोजी टपाल विभागाची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी संयुक्तपणे निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक विभागाच्या पुढाकाराने निवृत्तीवेतनधारकांना पोस्टमनमार्फत निवासस्थानाच्या दारात ‘डिजिटल जीवन प्रमाणपत्र’ जमा करून घेण्याची सुविधा देण्यास प्रारंभ केला आहे.
आता कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्यावतीने IPPB मार्फत निवृत्तीधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अगदी दारापर्यंत सुविधा देण्यात येणार आहे. पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक यांचे जाळे संपूर्ण देशामध्ये आहे, त्याचा उपयोग आता यासाठी करण्यात येणार आहे.
*पार्श्वभूमी*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी नोव्हेंबर 2014 मध्ये निवृत्तीवेतनधारकांना ऑनलाइन ‘जीवन प्रमाण पोर्टल’च्या माध्यमातून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा सादर केली होती. निवृत्तीवेतनधारकांना सोईचे व्हावे आणि त्यांना पारदर्शक सुविधा उपलब्ध व्हावी, असा उद्देश यामागे आहे.
वयोवृद्ध सेवानिवृत्तीधारकांना त्यांचे निवृत्तीवेतन मिळविण्यामध्ये कोणतीही समस्या येवू नये, यासाठी कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्तीधारकांसाठी अधिकाधिक सोयी करून दिल्या जात आहेत.
*इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) विषयी*
ती भारत सरकारच्या 100 टक्के मालकीची पेमेंट बँक आहे. त्याची स्थापना दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या टपाल कार्यालयाच्या अंतर्गत करण्यात आली. IPPB प्रायोगिक प्रकल्प म्हणून 30 जानेवारी 2017 रोजी रांची (झारखंड) आणि रायपूर (छत्तीसगड) येथे कार्यरत करण्यात आले होते. त्याचे व्यवस्थापन भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) करते.