शिवशक्ती टाइम्स न्यूज
प्रतिनिधी -युसूफ पठाण
महावितरणाकडून लोकांना वाढीव वीजबिलाचा शॉक देण्यात आला होता, वीजबिलात सवलत मिळावी अशी मागणी अनेकांनी लावून धरली होती.
▪️मात्र वीज वापरली तर बिल भरावं लागेल, कुठलीही वीजबिल माफी मिळणार नाही असा धक्का राज्यातील सर्वसामान्य जनतेला मिळाला आहे.
📌 याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले की, वाढीव वीजबिलात सवलत देणे अशक्य आहे, वीज वापरली असेल तर बिल भरावं लागेल. लॉकडाऊनमध्ये आलेली बिलं भरली पाहिजे.
🔎 वापरापेक्षा वाढील बिल आली असतील तर त्याची चौकशी सुरु आहे. पण ज्यांनी वीज वापरली त्यांना बिल भरावे लागेल.
▪️राज्यातील वीजबिलाच्या सवलतीचा प्रस्ताव केंद्राने मदत करावी यासाठी पाठवला होता परंतु केंद्र सरकारने मदत केली नाही त्यामुळे वीजबिलात माफी नाही असं नितीन राऊत म्हणाले.
▪️ वीजबिल भरण्याबाबत महावितरणने परिपत्रक जारी केले आहे, यात डिसेंबर 2020 पर्यंत थकीत वीजबिले भरावेत असे आदेश देण्यात आले आहेत.