Breaking News

२५० सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांतून मार्ग काढत अपहरणकर्त्यांच्या मुसक्या…..

 शिवशक्ती टाइम्स न्यूज

मुंबई (प्रतिनिधी):
जुहू परिसरातील झोपडपट्टीतून चार महिन्यांच्या बाळाची चोरी करून त्याची तेलंगणात विक्री करण्याचा डाव पोलिसांनी २५०
सी.सी. टी.व्ही. कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणातून मागोवा घेत उधळून लावला.
मूल दत्तक देण्याच्या बहाण्याने चार लाख रुपयांना एका डॉक्टरनेच या बाळाची विक्री केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी महेश धमैय्या डिट्टी (३८), रमेश व्यंकट व्यंपत्ती (४२) आणि डॉ. मोहम्मद नसरुद्दीन बशीररुद्दीन (४६) यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पीडित मुलाचे कुटुंबीय जुहू परिसरात गोखले रस्त्यानजीकच्या झोपडपट्टीत वास्तव्याला आहे.
पथारीवर फुलांची आणि इतर वस्तूंची विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
चार महिन्यांच्या बाळाची चोरी झाल्याची तक्रार या कुटुंबाने ११ नोव्हेंबरला जुहू पोलिसांकडे नोंदविली होती.
ही गंभीर घटना असल्याने जुहू पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
साहाय्यक पोलीस निरीक्षक हरिभाऊ बिरादार आणि गणेश तोडकर  यांच्या पथकाने जुहू परिसर आणि मुंबई शहरातील सुमारे २५० सी.सी.टी.व्ही. कॅमेरांच्या चित्रीकरणाची तपासणी केली.
यात जुहू येथील गोखले रस्ता परिसरात एक रिक्षावाला संशयितरीत्या फिरताना पोलिसांना आढळला.
पोलिसांनी रिक्षाचालक रमेश याचा पत्ता शोधून अंधेरी परिसरातून ताब्यात घेतले.
रमेशच्या चौकशीतून महेश याने मुलाची चोरी केल्याचे समोर आले.
त्यानुसार पोलिसांनी महेश याला अंधेरी पश्चिम येथील गावदेवी डोंगर परिसरातून अटक केली.
चोरी केलेले मूल त्याने हैदराबाद येथील डॉ. बशीरुद्दीनला दिल्याचे महेश याने कबूल केले.
त्यानुसार पोलिसांनी एक पथक हैदराबाद येथे पाठवून बशीरुद्दीनला अटक केली.
त्याने चार लाख रुपयांना हे मूल एका जोडप्याला विकले होते.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.