Breaking News

भिन्न रक्तगट असतानाही मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज

 

मुंबई (प्रतिनिधी -युसूफ पठाण)
भिन्न रक्तगट असतानाही पत्नीची किडनी पतीमध्ये यशस्वीपणे प्रत्यारोपित करण्याची कामगिरी मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखवली आहे.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली.
तसेच पती-पत्नीमधील प्रेमालाही यानिमित्ताने नवा आयाम लाभला.
मुंबईत राहणाऱ्या आणि ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगट असणाऱ्या चाळीस वर्षांच्या व्यक्तीचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता.
प्रत्यारोपण करताना जवळच्या नातेवाईकांपैकी ज्यांचा रक्तगट समान आहे, अशा एका व्यक्तीची किडनी प्रत्यारोपित केली जाते.
मात्र या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आई, वडील आणि भावाचा रक्तगट जरी समान होता; तरी आईच्या किडनीची कमी कार्यक्षमता, वडिलांचे वय आणि भावाच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांची किडनी प्रत्यारोपित करणे शक्य नव्हते.
रुग्णाच्या पत्नीने पतीला किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मात्र, तिचा रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ होता.
रक्तगट भिन्न असल्याने किडनी प्रत्यारोपणात अडचणी होत्या.
पालिकेच्या बा. य. ल. नायर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी याबाबत वैद्यकशास्त्रातील प्रगत पद्धतींनुसार आणि भिन्न रक्त गटातील व्यक्तींच्या प्रत्यारोपणविषयक वैद्यकीय उपचार क्रमानुसार संबंधित बाबी अमलात आणल्या.
त्यानंतर २ मार्च रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली.
रक्तगट विसंगत असूनही प्रत्यारोपणाच्या  शस्त्रक्रियांनंतर सुरुवातीचे सहा महिने अत्यंत काळजी घ्यावी लागते.
ही शस्त्रक्रिया होऊन आता आठ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे.
त्यामुळे हे प्रत्यारोपण यशस्वी ठरले असे म्हणता येईल,
असे सांगितले.

About Shivshakti Times

Check Also

बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात……

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात…… मुंबई : …

लागबागमध्ये सिलेंडरचा स्फोट, 16 जण होरपळले

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात एका इमारतीत गॅस सिलेंडरचा …

महिलेचं आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत वास्तव्य, धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले…..

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज मुंबई पोलिसांना वांद्रे येथील घरात ८३ वर्षीय महिलेचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *