मोसमपुल चौकातील सिग्नल यंत्रणेची राज्याचे कृषी मंत्री ना. दादाजी भुसे व मनपा आयुक्त त्रंबक कासार यांच्या द्वारे चाचपणी.
शिवशक्ती टाइम्स न्यूज
मालेगाव महानगरपालिका मार्फत प्रभाग क्र.1 मधील मोसम पुल चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेची चाचपणी राज्याचे कृषी मंत्री महोदय दादाजी भुसे, मनपा आयुक्त त्रंबक कासार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपायुक्त नितीन कापडणीस, नगर सेवक अॅड. गिरीश बोरसे, शहर अभियंता कैलास बच्छाव, एम.पी.एस.एल. कंपनीचे उपविभागीय अधिकारी वाय.एस. नागेंद्र , पोलीस निरीक्षक बशीर शेख, इत्यादी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मालेगाव शहरात महानगरपालिकेच्या विद्युत विभागा कडून सिग्नल यंत्रणा उभारणे बाबत मनपाचे स्वीकृत सदस्य अॅड. गिरीश बोरसे यांच्या नगरसेवक निधीतून मे. नुक्लिऑनिक्स, ट्रॉफिक इक्विपमेटस् प्रा. लि. या मक्तेदार कडून प्रभाग क्र. 01 कार्यक्षेत्रातील मोसमपुल चौकात ट्रॅफीक सिग्नल यंत्रणा बसविणे ची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करने साठी त्याची प्राथमिक चाचपणी राज्याचे कृषी मंत्री महोदय दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी 5.15 वा. प्रत्यक्ष जागेवर करण्यात आली.
यावेळी कृषिमंत्री महोदय यांनी वाहतूक नियंत्रण साठी मालेगाव महापालिका यांचा शहर वाहतूक पोलिस शाखेच्या समन्वयाने चांगला उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामुळे शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. त्याचबरोबर महापालिकेने रहदारीस अडथळा ठरणारे विद्युत खांब स्थलांतरित करावे, हा शहरातील प्रमुख चौक असल्याने त्याचे सुशोभीकरण करावे, तसेच मोसमपुल चौकातील रहदारी नियंत्रित राहावी यासाठी पर्यायी समांतर रस्त्यावर उपाययोजना करावी इत्यादी निर्देश दिलेत.
यावेळी मनपाचे सदस्य अॅड. गिरीश बोरसे, संजय दुसाने, प्रमोद शुक्ला, मुस्तकिम डीग्निटी, इजाज बेग, विद्युत निरीक्षक संतोष अहिरे,स्वीय सहायक सचिन महाले, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, इत्यादी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जनसंपर्क अधिकारी, मनपा मालेगाव