प्रतिनिधी – युसूफ पठाण
(शिवशक्ती टाइम्स न्यूज)
हिवरखेड (जि.अकोला) : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तेल्हाऱ्याचे संजय गांधी निराधार योजनेचे नुकताच पदभार सांभाळणारे नायब तहसीलदार राजेश गुरव हे तेल्हारा तालुक्यातील आदिवासी पुनर्वसित उमरशेवडी व तलाई गावाला अडचणी जाणून घेण्यासाठी गेले असता असे लक्षात आले की या आदिवासी भागात मात्र लोकांना दिवाळी बाबत माहिती सुद्धा नाही.
त्यामुळे राजेश गुरव, संतोष खवले, सय्यद अहमद, प्रा. प्रवीण बोंद्रे, सरपंच आमद सुरत्ने, नंदा ठाकरे, पोलिस पाटील हातम सुरत्ने, तलाठी देशमुख, सामाजिक कार्यकर्ता उमर बाजिद खाँ, सुरता डावर, इसराइल खाँ यांनी उमरशेवडी व तलाई गावातील लोकांसोबत दिवाळी साजरी केली.
हे पंचविस कुटुंबाचे गांव आहे तरीही मूलभूत सुविधा नसल्यामुळे आदिवासी समाज बांधव अंधारात जीवन जगतात तेव्हा नायब तहसीलदार राजेश गुरव यांनी आपल्या घरून फराळ आणून संपूर्ण गावात वाटप केले.
यावेळी अकोट न.पा.चे शिक्षण सभापती मो. खालिद जमा यांच्याकडून पूर्ण गावकऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले व वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.
त्यानंतर लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, आधार कार्ड व शासनाचे शासकीय योजना बाबत माहिती देण्यात आली.
माय-लेकीची भेट ठरली अखेरची, भाऊबीजेच्या पूर्वसंध्येलाच अज्ञात वाहनाने दिली धडक
उमरशेवडी व तलाई हे गावात पुरेसे पिण्याचे शुद्ध पाणी, शाळा, शेत रस्ते सुद्धा नाही व मूलभूत सुविधा पासून वंचित असल्याने ही बाब पाहुन नायब तहसीलदार राजेश गुरव, संतोष खवले, सय्यद अहमद, प्रा. प्रवीण बोंद्रे यांनी फराळ देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करून गावाच्या विकासासाठी गाव दत्तक घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करून त्यांना प्रवाहात आणण्याची शपथ घेतली.