Breaking News

भाजपा नेते राम कदम मुंबई पोलिसांच्या ताब्यात

भाजपा नेते राम कदम मुंबई पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी – युसूफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज

पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत राम कदम आणि त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतलं आहे.

🧐 प्रकरण ‘असं’ आहे..

▪️ राम कदम यांनी बुधवारी सकाळी 8.30 वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं.

▪️ पालघर हत्याकांडाला 211 दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती. राम कदम यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीदेखील केली आहे.

▪️ यावर “पोलिसांची ही कारवाई दुर्देवी असून सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे’, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.

👇 ‘या’ प्रकरणाचं मूळ-

16 एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या 2 साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी 154 जणांना अटक केली असून 11 अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच 5 पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून 30 हून अधिक बदल्या करण्यात आल्या आहेत. पालघरमधील घटनेनंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.