Breaking News

तीतूर नदीच्या पुरात वाहून गेलेल्या कैलास पाटील यांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत…

आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते तहसील कार्यालयात धनादेश सुपूर्द

शिवशक्ती टाइम्स न्यूज
————————————————–
चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावातील शेतकरी कैलास पाटील यांचा गावाजवळून वाहणाऱ्या तीतूर नदीच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. घरातील एकमेव कर्ता गेल्याने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याने शासकीय मदत मिळावी यासाठी त्यांनी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण व पंचायत समिती गटनेते संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ तहसीलदार यांना सूचना देऊन शासनातर्फे जास्तीत जास्त मदत मयत कैलास पाटील यांच्या कुटुंबियांना देण्यात येण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मयत कैलास पाटील यांच्या पत्नी श्रीमती निलाबाई कैलास पाटील यांच्या नावाने ४ लाख रुपये मदतीचा धनादेश आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वितरित करण्यात आला. यावेळी तहसीलदार अमोल मोरे, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, नायब तहसीलदार विशाल सोनवणे व मयत कैलास पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पाटील कुटुंबियांच्या नशीबी आलेल्या दुःखापुढे मिळालेली मदत जरी छोटी असली तरी त्यांना आधार देण्याचा हा प्रयत्न आहे, इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून देखील काही मदत करता येईल का याबाबत मी सूचना दिल्या असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिली.

About Shivshakti Times

Check Also

मनसुख मृत्युप्रकरणी हत्येचा गुन्हा….

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकावण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोटारीचे ताबेदार …

राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी अर्धसत्य”…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी युसूफ पठाण राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात ही बातमी …

निवडणुक आयोगाने आरोग्य मंत्रालयाला दिल्या सूचना, म्हणाले…….

पश्चिम बंगालसह चार राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. तारखा जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने आयोगाकडे तक्रार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *