Breaking News

शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

पाळसखेड पिंपळे येथील घटना – शिवशक्ती टाइम्स न्यूज

भोकरदन (प्रतिनिधी युसूफ पठाण ): जुनैद पठान भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे येथील तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. तिघे भाऊ शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते अशी माहिती मिळाली. एकाचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.

सूत्राकडून मिळालेल्या माहितनुसार पळसखेड पिंपळे येथील ज्ञानेश्वर अप्पासाहेब जाधव वय (२६),रामेश्वर अप्पासाहेब जाधव वय(२६) व सुनिल अप्पासाहेब जाधव वय(१८) हे तिघे भाऊ बुधवारी रात्री ८ वा.च्या दरम्यान शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी तिघे भाऊ गेले होते.पाणी देण्यासाठी एकाने विहिरिवरिल विद्युत पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला.पण त्याला विद्युत धक्का बसून तो विहिरीत पडला.दोघ भावांनी त्याला वाचावण्यासाठी विहिरीत उडी घेतली असता विहिरीत विद्युत प्रवाह उतरलेला असल्याने तिन्ही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.उशीर झाल्याने मुले घरी परतले नाही म्हणून नातेवाईकांनी त्यांना फोन केला.तिघांचे फोन लागले पण फोन उचलत नसल्याने नातेवाईकांची चिंता वाढली.मध्यरात्री दोन वाजता नातेवाईक शेतात गेल्यावर तिघेही विहिरीत बुढल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच हसनाबद पोलिस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.पळसखेड पिंपळे येथील तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोचल्यावर गुरुवारी सकाळपासून गावात नातेवाईकांची गर्दी वाढली होती.तिघांपैकी ज्ञानेश्वरीचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता.अप्पासाहेब जाधव यांना तीन मुले आहेत.दोन मुले औरंगाबाद येथे कंपनीत कामाला होती.लॉकडाऊन लागल्यापासून ते घरी आले होते.तीन कर्त्या मुलांच्या मृत्युने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Shivshakti Times

Check Also

जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिका गुड्ड तिवारीचा खून,

कमाल चौकात दिवसाढवळ्या थरार…… नागपूर : जमिनीच्या वादातून भूखंड व्यावसायिकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. …

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला अटक……..

दाक्षिणात्य अभिनेत्री चित्रा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीला अटक शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण …

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनची विधानभवनात गृहमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पोलिस पाटीलांचे मानधन वाढीसह अनेक प्रश्न मार्गी लागणार शिवशक्ती टाइम्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *