Breaking News

मालेगाव मनपा कार्यक्षेत्रातील खाजगी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी Covid-१९ साठी RTPCR testing करुन घेणे अनिवार्य

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये मा.अपर मुख्य सचिव,म.शासन, क्रमांक- संकीर्ण २०२०/प्र.क्र.१४० एसडी-६., शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई -३२ यांचे पत्र दि.१७ नोव्हेंबर २०२० आणि मा.उप सचिव, म.शासन याचे परिपत्रक क्र. संकिर्न २०२०/प्र.क्र.१४०/ एसडी-६, मंत्रालय, मुंबई-३२. दि.१०. नोव्हेंबर, २०२० चे परिपत्रकातील म.शासनाचे मार्गदर्शक सुचनांचे (SOP) पालन होईल यादृष्टीने आवश्यक सोयी – सुविधेसाठी खाजगी शाळेच्या व्यवस्थापकांनी त्यांचे स्तरावरुन नियोजन करून उपलब्ध करणे आवश्यक आहे, उदा.Snnitizer,
Thermal gun, Pulse oximeter, जंतूनाशक साबण इत्यादी.

म.शासनाचे पत्र/परिपत्रकान्वये दिनांक १७ नोव्हेंबर, २०२० ते २२ नोव्हेंबर, २०२० या कालावधीत खाजगी शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा व्यवस्थापनामार्फत किंवा वैयक्तिक सदर शिक्षक व शिक्षकेतर
कर्मचारी यांनी त्यांचे स्तरावरुन मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात मान्यता प्राप्त प्रयोगशाळा १) प्रगती क्लीनिकल
लेबोरेटरी, सटाणा नाका, मालेगाव (८३७९०३९०९६),
२) पराग लॅब अॅन्ड वेलनेस सेंटर, मालेगाव (९४२२२५८८८७,९२२५३८८७८६),
३) श्री. साई क्लिनिकल लॅबोरेटरी, मालेगाव कॅम्प(८८०५९५५२१५, ७२१९१७०१८९), व
४) जिजामाता डायग्नोस्टिक, काम्प्युटराईज क्लिनिकल लेबोटरी, मालेगाव (०२२५४-२५१९८६, ९३७१२६२६२८) चार ठिकाणांपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन Covid-१९ साठी RTPCR testing करुन घेणे आणि त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे RTPCR testing चे दर स्वतः अदा करावे. व त्याचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापन यांना सादर करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाकडुन पडताळणी होणार असलेने व सदर माहिती शासनास सादर करावयाची असलेने प्रयोगशाळेने विचारलेली सर्व माहिती व आयश्यक कागदपत्रे देणे आवश्यक राहिल. सर्व नोंद RTPCR घेणाऱ्या प्रयोगशाळेमार्फत ठेवणे आवश्यक असणार आहे.

याची सर्व शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नोंद घ्यावी व उक्त शासनाने दिलेले पत्र व परिपत्रकाच्या अनुषंगानं शाळा व्यवस्थापन व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यानी (SOP) तंतोतंत पालन करावे असे मालेगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खाजगी शाळा व्यवस्थापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मा.महापौर, ताहेरा रशिद शेख व मा. आयुक्त, त्र्यंबक कासार यांचे मार्फत सर्वांना मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने जाहिर आवाहन करणेत येत आहे.

About Shivshakti Times

Check Also

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! याच महिन्यात सुरू होतेय बहुप्रतिक्षित सेवा,

प्रवासात अजिबात नाही येणार कंटाळा……. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली …

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक ; परीक्षा रद्द……

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक ; ⭕ परीक्षा रद्द…… शिवशक्ती टाइम्स न्यूज’ प्रतिनिधी …

सर्वसामान्यांना पुन्हा झटका,…घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या……

सर्वसामान्यांना पुन्हा झटका, ⭕चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या…… शिवशक्ती टाइम्स न्यूज’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *