इंदोर मधील ज्वेलरी शॉपमधील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह ;
खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचा शोध सुरू……
शिवशक्ती टाइम्स न्यूज – आनंद दाभाडे
मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्याला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
असं असतानाच इंदूर शहरातील एका ज्वेलर्सच्या दुकानामधील तब्बल ३१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सणासुदीच्या कालावधीमध्ये या ज्वेलर्सच्या दुकानामधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा शोध घेण्याचं काम करोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुरु केलं आहे.
“करोनाचा संसर्ग झालेल्या दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास आम्ही सुरुवात केली आहे.
मागील आठवड्याभरात या लोकांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आम्ही घेत आहेत.
या लोकांना सर्दी, खोकला, ताप यासारखी काही लक्षण दिसत असतील तर त्यांची करोना चाचणी केली जाणार आहे,” अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डॉ. प्रविण जाडिया यांनी एन.डी.टी.व्ही.शी बोलताना दिली.
आनंद ज्वेल्स या दुकानातील ३१ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दुकान बंद करण्यात आलं असून ते वेळोवेळी सॅनिटाइज करण्यात येत आहेत.
ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दुकान पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच देशभरामध्ये दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने अनेकांनी घराबाहेर पडत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या गोष्टींची खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे पहायला मिळालं.
मागील काही महिन्यांच्या तुलनेत या महिन्यामध्ये अनेकजण घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आलं.
Twenty staff members of a jewellery shop in Indore have tested positive for COVID-19. They've records of people who bought products from their shop but it's a challenge to trace those who did not buy anything: Dr Praveen Jadia, Chief Medical Officer
(18.11.2020) #MadhyaPradesh pic.twitter.com/BrhGMPuriz
— ANI (@ANI) November 19, 2020
मंगळवारी रात्री इंदूरमध्ये 194 नवीन रुग्ण आढळले. त्याचवेळी जणांचा मृत्यू झाला. या महिन्याच्या 17 तारखेपर्यंत 2841 नवीन पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत,
त्याच वेळी, 37 मृत्यू देखील झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 2032 वर पोहोचली आहे.
आतापर्यंत 1 लाख 46 हजार 183 जलद प्रतिजैविक नमुने घेण्यात आले आहेत, तर आतापर्यंत 4,49, 919 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत 36055 पैकी 34304 रुग्ण बरे झाले आहेत. तर 719 मृत्यू झाला आहे.