तेलंगणाच्या डॉक्टरची चौकशी,
⭕बाळचोरीचे आणखी गुन्हे केल्याचा संशय……
शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण
मुंबई : जुहूतील पदपथावरून चोरलेले बाळ तेलंगणातील दाम्पत्याला चार लाखांत विकणाऱ्या डॉक्टरने याआधीही अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले असावेत, असा संशय पोलिसांना आहे.
तसेच या डॉक्टरच्या पदवीबाबतही जुहू पोलिसांना संशय आहे.
त्यादृष्टीने डॉक्टरकडे कसून चौकशी सुरू आहे.
डॉ. महोम्मद बशीरुद्दीन असे डॉक्टरचे नाव असून तो तेलंगणा येथे वैद्यकीय काम करतो.
मूल होत नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या दाम्पत्याला त्याने दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता.
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अधिकृतरीत्या बाळ दत्तक घेऊन देतो, असे सांगून डॉ. बशीरुद्दीनने या दाम्पत्याकडून चार लाख रुपये घेतले होते.
अन्य अटक आरोपींपैकी एक तरुण तेलंगणाचा रहिवासी आणि डॉ. बशीरुद्दीनचा परिचित होता.
त्याला हाताशी धरून बशीरुद्दीनने हा गुन्हा केला.
दाम्पत्याची समजूत स्थानिक पोलिसांनी बशीरुद्दीनला ताब्यात घेतले.
त्यानंतर जुहू पोलीस दाम्पत्याच्या घरी गेले, मात्र तोपर्यंत हे दाम्पत्य बाळाला घेऊन अन्य ठिकाणी निघून गेले.
गावकऱ्यांच्या मदतीने या दाम्पत्याला पुन्हा बोलावण्यात आले.
सुमारे तीन ते चार तास जुहू पोलिसांनी त्यांची समजूत घातली.
मात्र अधिकृतरीत्या हे बाळ दत्तक घेतले आहे.
डॉ. बशीरुद्दीन यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण के ली आहे, यावर ते ठाम होते.
अखेर पोलिसांनी दाम्पत्यासमोर बशीरुद्दीनची चौकशी केली.
त्यात त्याने गुन्हा कबूल केला.
मे. न्यायालयाने याप्रकरणी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना २३ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोठडीतील चौकशीत या गुन्ह्य़ासोबत अशाप्रकारच्या अन्य गुन्ह्य़ांबाबत चौकशी
केली जाईल, असे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पोलीस निरीक्षकांनी सांगितले.