एस.टी प्रवासात एका महिले सोबत झालेली ओळख, एका आईला चांगलीच महागात पडली
शिवशक्ती टाइम्स न्यूज
पुणेःएस.टी प्रवासात एका महिले सोबत झालेली ओळख, एका आईला चांगलीच महागात पडली होती.
त्या महिलेचे चार महिन्याचं बाळ पळवून नेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी हडपसर येथे घडली होती.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
त्या घटनेचा काही तासांतच पोलिसांनी छडा लावला असून आरोपी महिलेलाही अटक करण्यात आली आहे.
तसंच चार महिन्याच्या चिमुकलीला तिच्या आईकडे सुखरूप स्वाधीन करण्यात आलं आहे.
अहमदनगर येथील लोणी येथे राहणार्या मंजू देविदास मोरे यांच मंगळवारी पती सोबत भांडण झालं.
त्यानंतर मंजू यांनी सातारा येथे गावी जाण्याचा निर्णय घेतला.
अहमदनगरवरुन त्या साताऱ्याकडे जाणार्या एस.टी.मध्ये बसल्या.
या प्रवासादरम्यान मंजू यांची एका महिलेशी गप्पांमधून ओळख झाली.
या महिलेनेही बोलण्यामधून मंजू यांचा विश्वास संपादन केला.
यावेळी बोलत असताना मंजू यांनी सदर महिलेला आपल्या पतीसोबत झालेल्या भांडणाविषयी सांगितलं.
यावेळी महिलेने एस.टी. स्वारगेट स्टँडला पोहचल्यावर मंजु यांना आपल्या घरी येण्याचा प्रस्ताव दिला.
हडपसर भागात दोन्ही महिला एका चायनिज हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मंजू यांनी आपल्या बाळाला थोड्यावेळासाठी आरोपी महिलेकडे सोपवलं.
यावेळी महिलेने संधी साधत मंजू यांची नजर चुकवत त्या ठिकाणावरुन पोबारा केला.
आपल्या बाळाला घेऊन गेलेली महिला बराच वेळ झाला तरी दिसली नाही म्हणून मंजू यांनी शोध सुरु केला.
पण बराच वेळ शोध घेऊनही आपलं बाळ सापडत नसल्याने अखेरीस मंजू यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तर बाळाच्या शोधासाठी विशेष पथके नेमण्यात आली होती.
त्याचदरम्यान मांजरी येथील परिसरात एका महिलेकडे बाळ आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली.