Breaking News

शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप – चेतन पाटील

नासिक येथील शिवप्रेमी चेतन पाटील व मित्रांचे रायगड दर्शन

शिवशक्ती टाइम्स न्यूज – राजेश सोनवणे

नासिक : हिंदवी स्वराज्याचे चे संस्थापक महाराष्ट्रा तील मराठी बांधव तसेच माता भगिनींच्या हृदयात विराजमान असलेले मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड ह्या स्वराज्याच्या राजधानीत शिवप्रेमी चेतन भाऊ पाटील , शुभम डोके, शुभम शिरसाठ सह मित्र मंडळीनी दिवाळी सुट्टी चे औचित्य साधून शिवरायांच्या बद्दल असलेली श्रद्धा व आदर यांचा परिचय दिला त्याच बरोबर त्यांनी सर्व शिवप्रेमी ना रायगडावर येऊन महाराजांचा पराक्रम रायगडावर असलेली ऊर्जा शक्ती ची अनुभव व प्रचिती घ्यावी असे आवाहन करत हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणे ने रायगड दणाणून सोडला नेताजी सुभाषचंद्र बोस , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आशा अनेक महान स्वातंत्र्य सेनानी समाज सुधारकांनी देखील शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्य तसेच विचारातून प्रेरणा घेऊन असामान्य अद्वितीय असे कार्य केले ती शक्ती म्हणजे शिवाजी महाराज असेही चेतन भाऊंनी ह्या वेळी सांगितले रोपवे बंद असताना देखील मराठा मावळ्यांनी किल्ला पायी सर केला शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप ही उक्ती चेतन पाटील यांनी महाराजांच्या बद्दल असलेल्या प्रेमापोटी सत्यात उतरवून रायगड पायी सर केला ह्या वेळी त्यांनी गडावरील मनोहर अश्या दृश्याची फोटो ग्राफी तसेच विडिओ ग्राफी करून महाराष्ट्र प्रेमी व शिवप्रेमी ना शिवदर्शन करून दिले त्या बद्दल शिवशक्ती टाईम्स न्युज कडून आभार जय शिवराय जय महाराष्ट्र

About Shivshakti Times

Check Also

भुकेल्याची भुक भागविण्याचे महत्वपूर्ण काम करते शिवभोजन केंद्र : कृषीमंत्री भुसे

सामान्य रुग्णालय परिसरात शिवभोजन केंद्राचे उद्घाटन शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी अल्प दरासह संकट …

माळमाथ्यावरील रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांनी केले खडयात वृक्षरोपण

मालेगाव : प्रतिनिधी  माळमाथ्यावरील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव या गावातील रस्त्यांची जीवघेणी दुरावस्था …

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश

राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या मागणीला यश केंद्र सरकारने दिला खत सबसिडी वाढविण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published.