Breaking News

कोरोनाच्या संभाव्य लाटेच्या काळात स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या : पालकमंत्री छगन भुजबळ

दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ‘ग्रीन ज्युस’उपयुक्त : : पालकमंत्री छगन भुजबळ

कोविडोत्तर व्यवस्थापन शिबिराचे झाले उद्घाटन

*शिवशक्ती टाइम्स न्यूज* -मुख्य संपादक जयेश सोनार (दाभाडे )

नाशिक, दि.21 नोव्हेंबर 2020 (जिमाका वृत्तसेवा):

सर्व प्रशासकीय यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे कोरोनासारख्या आजाराला अटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. तसेच येणाऱ्या काळात कोरोनाची संभाव्य दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या स्वत:ची तसेच कुटुंबाची काळजी घ्यावी; त्यासाठी उपाय म्हणून पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय् यांच्या संकल्पनेतून तयार झालेला ग्रीन ज्युस उपयुक्त ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र पोलिस अकादमी येथील खुल्या सिनेमागृहात आज कोविडोत्तर व्यवस्थापन शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री यांचे हस्ते शनिवारी करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येणार आहे, अशी शक्यता अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत असून अनेक देशांमध्ये ती आलीय. ही लाट आधीपेक्षा पाच ते सहापट अधिक असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदार नागरिकाने आपली व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात रुग्णसंख्या जर वाढली तरी प्रशासनाने बेड, औषधे, ऑक्सिझन याची मुबलक प्रमाणात तरतुद केली असल्याची माहिती पालकमंत्रीश्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.

‘ग्रीन ज्युस’ शुध्द आहे. त्यामुळे प्रत्येकाने याचे सेवन करावे. पोलीस आयुक्त श्री. पाण्डेय यांनी पदभार घेतल्यानंतर लगेचच पोलिसांसाठी ‘पोलिस कोविड सेंटर’ सुरू केले. तसेच आता पोलीसांच्या आरोग्याचा विचार करून ग्रीन ज्युसची संकल्पना आणली. यामुळे नक्कीच पोलिसांबरोबरच सर्व नागरिकांना याचा फायदा होणार आहे. पोलीस आयुक्त श्री. पाण्डेय यांनी कोरोना काळात असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने ‘माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी केली असल्याचे, मत पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले.

इतर राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय आणि त्या नंतर ची परिस्थिती याचा अभ्यास करूनच जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

वातावरणाचा उपयोग आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी करावा : राधाकृष्ण गमे

नाशिक जिल्हा व शहराला आल्हाददायी वातावरणाचे वरदान आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या वातावरणाचा उपयोग आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी करावा. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करून उत्तम आहारा बरोबर ग्रीन ज्युसचेही सेवन करावे. ग्रीन ज्युसच्या सेवनामुळे नक्कीच नाशिक जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी मदत होणार, असा आशावाद विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी व्यक्त केला.

कुंटुब प्रमुखाप्रमाणे प्रत्येक सहकाऱ्याची काळजी घेतली : प्रताप दिघावकर

कोरोनाला रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे. त्याच बरोबर पोलीसांसह प्रत्येक नागरिकाने ‘ग्रीन ज्युसचे’ सेवन करणे गरजेचे आहे. पोलीस आयुक्त श्री. पाण्डेय यांनी ‘पोलीस कोविड सेंटर’ सुरू करुन पोलिसासाठी ‘ग्रीन ज्युसची’ संकल्पना मांडून अगदी कुंटुब प्रमुखाप्रमाणे पोलीस विभागातील प्रत्येक सहकाऱ्याची काळजी घेतली आहे. येणाऱ्या काळात श्री. पाण्डेय् यांना नाशिकमध्ये पोलिसांसाठी भारतातील एकमेव नॅचरोपॅथी सेंटर सुरू करण्यासाठी पोलीस विभागामार्फत सक्रीय पाठबळ देण्यात येणार असल्याचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी यावेळी सांगितले.

प्रशासनातील प्रत्येक माणूस तंदुरस्त आणि मजबुत मानसिकतेचा असेल तरच तो जनतेची काळजी घेवू शकतो: सूरज मांढरे

कोरोनासारख्या महामारीशी लढण्यासाठी सर्वांनी सक्षम असणे आवश्यक आहे. कारण प्रशासनातील प्रत्येक माणूस जर तंदुरस्त व मजबुत मानसिकतेचा असेल तरच तो जनतेची काळजी घेवू शकतो. हा विचार ठेवूनच पोलीस आयुक्त श्री. पाण्डेय यांनी या ‘ग्रीन ज्युसची’ निर्मिती केली आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी नक्कीच ‘ग्रीन ज्युसची’ मदत होणार असून, येणाऱ्या काळात नक्की हा ‘ग्रीन ज्युस’ घर घर की कहानी होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी व्यक्त केले.

रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार : पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोनापासून पोलीसांना सुरक्षित ठेवण्याबरोबरचं पूर्वी कोरोनाबाधित झालेले तसेच ज्येष्ठ नागरिक व नव्याने कोरोनाची लागण होवू नये यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यादसाठी ‘ग्रीन ज्युसची’ निर्मिती केली आहे. शरीरातील कोमॉर्बिडीटी कमी करण्यासाठी, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच कोरोनाची दुसरी लाट आली तर त्या पासून बचाव करण्यासाठी तसेच शरीरामधील पृथ्वीतत्व संतुलित करण्यासाठी ग्रीन ज्युस उपयुक्त असल्याचे पोलीस आयुक्त श्री. पाण्डेय् यावेळी म्हणाले. तसेच पोलीसांसाठी सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटर मधून आजपर्यंत दोनशे रुग्णांवर उपचार करण्यात आले असून त्यामध्ये एकही रुग्ण दगावला नसल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.

सामाजिक बांधिलकी लक्षात येते : कैलास जाधव

पोलीस आयुक्त श्री. पाण्डेय यांच्या कामातून त्यांची सामाजिक बांधिलकी आणि व्यापक भूमिका लक्षात येते. त्यांनी तयार केलेल्या ग्रीन ज्युस नक्कीच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लाभदायक ठरणार आहे, असे मत महानगरपालिका आयुक्त केलास जाधव यांनी व्यक्त केले.

ग्रीन ज्युसचा वापर करून पोलीस विभागातील सर्व कुंटुंब कोरोनाचा यशस्वी मुकाबला करतील. तसेच येणाऱ्या काळात ‘ग्रीन ज्युस’ फायदेशीर ठरणार असल्याचे मत, पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले.

दैनंदिन आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे खूप आवश्यक असते. भविष्यात जर मेडीसीनमुक्त आयुष्य जगायचे असेल तर सात्विक जीवनशैली सोबतच ग्रीन ज्युसचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात पालकमंत्री श्री. भुजबळ यांचे समवेत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी ‘ग्रीन ज्युसचे’ सेवन केले. तसेच कार्यक्रमात पोलीस कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत सर्व डॉक्टर्स आणि नर्स यांचा सत्कार व गौरव करण्यात आला.

About Shivshakti Times

Check Also

मालेगावी १० तलवारींसह चौघे ताब्यात

शहर पोलिस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई शिवशक्ती टाइम्स न्यूज मालेगाव : प्रतिनिधी शहरातील रमजानपुरा …

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️

‼️ वाहतूक पोलिसांची कोर्टाने केली कानउघाडणी‼️ चलन अथवा दंडाची रक्कम जागीच भरण्याबाबत जबरदस्ती करू नये,” …

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओझर विमानतळावर स्वागत शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी -युसूफ पठाण मुख्यमंत्री उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *