Breaking News

महिलेचं आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबत वास्तव्य, धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले…..

प्रतिनिधी – युसूफ पठाण

शिवशक्ती टाइम्स न्यूज

मुंबई पोलिसांना वांद्रे येथील घरात ८३ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मार्च महिन्यातच महिलेचा मृत्यू झाला आहे.
मात्र यानंतरही महिलेच्या ५३ वर्षीय मुलीने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही.
मुलगी गेल्या आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबतच राहत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिलेच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली असता हा प्रकार उघडकीस आला.
मुंबई मिररने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
महिलेची मुलगी घऱाच्या खिडकीतून कचरा फेकत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
पोलीस घरी पोहोचले असता मुलगी संपूर्ण लॉकडाउनदरम्यान आपल्या आईच्या मृतदेहासोबत घरात राहत असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या निदर्शनास आली.
पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता महिलेच्या मुलीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
यामुळेच मुलीने आईच्या मृतदेहासोबत कोणाला माहिती दिली नसावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
महिलेने काही वर्षांपूर्वी आपल्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतरही अशाच पद्दतीने कोणाला न कळवता घरात मृतदेह ठेवला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.
दरम्यान महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तसंच आईच्या मृत्यूसंबंधी विचारण्यात आलेलं प्रश्न, मृत्यूचं कारण यासंबंधी काहीही उत्तर देऊ न शकल्याने मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

About Shivshakti Times

Check Also

वाईफ स्वॅपिंगसाठी नवरा करत होता जबरदस्ती, अखेर महिलेने उचलले हे पाऊल…..

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण अहमदाबादच्या एस.जी. हायवेवरील वाय.एम.सी.ए. क्लब जवळच्या पॉश वसाहतीत …

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत……

अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणप्रकरणी महिला अटकेत…… मुंबई : अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी …

बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात……

शिवशक्ती टाइम्स न्यूज (प्रतिनिधी युसूफ पठाण) बनावट कागदपत्रांद्वारे मलजल विल्हेवाटीचे काम कंत्राटदाराच्या पदरात…… मुंबई : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *