Breaking News

करोनाच्या संकटातही लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी…..

प्रतिनिधी – युसूफ पठाण

शिवशक्ती टाइम्स न्यूज

दिवाळीच्या सुट्टीनंतर लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
करोना संसर्ग आणि रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना पर्यटनस्थळे गजबजली आहेत.
रविवारी मोठय़ा संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
दिवाळीची सांगता झाल्यानंतर पुणे-मुंबईतील पर्यटक शनिवार, रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येत आहेत.
गेल्या आठवडय़ापासून लोणावळा परिसरात पर्यटकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळाले.
रविवारी लोणावळा शहरात मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल झाल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची कोंडी झाली.
लोणावळा नगरपरिषदेने दसऱ्याच्या मुहूर्तावर खंडाळा येथील तलावात नौकाविहार सुरू केला आहे.
नौकाविहारासाठी पर्यटकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
रविवारी तुंगार्ली धरण, कार्ला लेणी, श्री एकवीरा देवी मंदिर, भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ला, पवना धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती.
काही महिन्यांपासून बंद असलेली लोणावळ्यातील हॉटेल, लहान मोठे व्यवसाय आता पूर्वपदावर येत आहेत.
दरम्यान, रविवारी राष्ट्रीय महामार्ग, लोणावळा शहर परिसरात झालेली कोंडी सोडविण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
काळजी घ्या.. करोनाचा संसर्ग कायम आहे.
लोणावळा, खंडाळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी करोना रोखण्यासाठी  दिलेल्या नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

About Shivshakti Times

Check Also

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, मारहाणीत पत्नीचे दातच पाडले……..

मटण बनवण्यास उशीर होईल सांगितल्याने पती संतापला, ⭕मारहाणीत पत्नीचे दातच पाडले…….. शिवशक्ती टाइम्स न्यूज – …

सांगली खून प्रकरण गुन्हे शाखा युनिट चार पिंपरी-चिंचवड कडून मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत अटक व गुन्हा उघड

पिंपरी-चिंचवड-  प्रतिनिधी – युसूफ पठाण  याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 13 सप्टेंबर 2020 रोजी …

 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा – शिवशक्ती टाइम्स न्यूज

🛑 पुणेकरांना दिलासा…! पुणे जिल्ह्यातील मार्गावर सुरू होणार….! एसटीची सेवा 🛑 ✍️ पुणे 🙁  ब्युरो चीफ शिवशक्ती टाइम्स न्यूज …

Leave a Reply

Your email address will not be published.