Breaking News

एन.सी.बी.(N.C.B.) चे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह कर्मचाऱ्यांवर हल्ला…….

शिवशक्ती टाइम्स न्यूज

प्रतिनिधी – युसूफ पठाण

एन.सी.बी.(N.C.B.) चे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला आहे.
गोरेगाव या ठिकाणी हा हल्ला झाला.
ड्रग्ज पेडलर्सकडून हा हल्ला मुंबईतील गोरेगावमध्ये काल संध्याकाळी झाल्याचं समजतं आहे.
या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे असंही वृत्त ए.एन.आय.ने दिलं आहे.
या प्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक तारे-तारकांवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते.
समीर वानखेडे हे एन.सी.बी.चे विभागीय संचालक आहेत.
बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं होतं.
एकूण पाच लोकांची टीम या कारवाईसाठी गेली होती.
कैरी मेंडिसला पकडून एन.सी.बी.च्या ऑफिसला आणण्यात आलं आहे.
या हल्ला प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.
एन.सी.बी.ने परवाच कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक केली.
त्यानंतर तिचा पती हर्ष लिम्बचिया याचीही कसून चौकशी केली.
त्याआधी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर यांचीही चौकशी केली होती.
ड्रग्ज प्रकरणात आधी रिया चक्रवर्तीला अटक झाली.
त्यानंतर बॉलिवूडच्या अनेक लोकांची नावं समोर आली.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.