नांदगांव : तालुक्यातील कुसुमतेल येथे झोपडीला आग लागुन हरी रामा वांजे यांचा मृत्यू झाला होता. तसेच आगीत संसार उपयोगी साहित्य व घरातील इतर वस्तु जळाल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार सुहासआण्णा कांदे यांनी वांजे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदारांनी स्वखर्चाने संसार उपयोगी साहित्य घेवून देणार असल्याचे सांगितले तसेच हरी रामा वांजे यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंबियांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून मदत मिळवुन देण्याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना सुचना केल्या तसेच वांजे कुटुंबियांना राहण्यासाठी घर नसल्यामुळे सद्यस्थितीत ते उघड्यावर राहात असल्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरकुलाचा लाभ मिळवुन देण्याबाबत गट विकास अधिकाऱ्यांना देखिल सुचना केल्या.
