Breaking News

जम्मू काश्मीर मध्ये चाळीसगांव येथील जवान शहिद

प्रतिनिधी युसुफ पठाण शिवशक्ती टाइम्स न्यूज

😭आमचं काय आज आहे तर उद्या नाही’, शहीद जवानाचा अखेरचा संवाद वाचून डोळे पाणावतील.

◾जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये (terrorist attack) महाराष्ट्राच्या जळगांव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथल्या यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आलं आहे.

◽यश हे अवघ्या 20 वर्षांचे होते. अगदी वर्षभराआधीच ते सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंगनंतर जम्मू काश्मीर इथं त्यांना तैनात करण्यात आलं. आज दुपारी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं.

◾सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यश यांचा मित्राशी केलेला अखेरचा संवाद समोर आला आहे. यामध्ये ‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’ असं यश यांनी मित्राला म्हटलं आहे.

◽यश यांच्या या अखेरच्या मेसेजमुळे संपूर्ण मित्र परिवारावरही शोककळा पसरली आहे.

◾खरंतर, यश देशमुख यांना आधीपासूनच सैन्य दलाचं आकर्षण होतं. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेत आणि सैन्य दलात भरती झाले होते. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

◽यश देशमुख यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. यश हे आज दुपारी 2 वाजता शहीद झाल्याची माहिती कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

◾यश यांच्या जाण्याची बातमी कळताच संपूर्ण पंचक्रोशीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे गावात एकही चूल पेटली नसून दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.

About Shivshakti Times

Check Also

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! याच महिन्यात सुरू होतेय बहुप्रतिक्षित सेवा,

प्रवासात अजिबात नाही येणार कंटाळा……. शिवशक्ती टाइम्स न्यूज प्रतिनिधी – युसूफ पठाण दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली …

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक ; परीक्षा रद्द……

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक ; ⭕ परीक्षा रद्द…… शिवशक्ती टाइम्स न्यूज’ प्रतिनिधी …

सर्वसामान्यांना पुन्हा झटका,…घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या……

सर्वसामान्यांना पुन्हा झटका, ⭕चार दिवसांत दुसऱ्यांदा घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या…… शिवशक्ती टाइम्स न्यूज’ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *