शिवशक्ती टाईम्स न्युज
प्रतिनिधी – राजेश (पप्पू) सोनवणे
मालेगाव कॅम्प परिसरातील श्री क्षेत्र स्मशान मारुती मंदिर येथे त्रिपुरारी पौर्णिमे चे औचित्य साधून संकेतवासी रामखिलावन दास फलहरी महाराज यांच्या आशिर्वादाने महंत श्री धर्मदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशान मारुती सुंदर कांड भक्त मंडळ तर्फे राम चरित्र मानस पाठ चे पारायण करण्यात आले सचिदानंद आनंद धन कोसलचंद रघुराम चंद्रा च्या कृपा आशीर्वादाने श्री राम समर्थ प्रभु चे पाठ पारायण श्रद्धेने पूर्ण करण्यात आले.
संसार तापाने जबाबदारी ने सर्व होरपळ लेले असताना राम नाम हाच एक तप्त जीवांच्या शांती चा मार्ग असल्याचे धर्मदास जी यांनी ह्या वेळी सांगितले. राम प्रभु चरणी असलेली श्रध्दा तसेच भक्ती चा ह्या प्रसंगी सर्वांना अनुभव आला पहाटे चार वाजता पाठ संपन्न झाला आरती करून स्मशान मारुती महाराजांच्या चरणी भक्त मंडळींनी आपली सेवा तसेच प्रेम समर्पित केले त्रेतायुगात रामजी चा अवतार झाला सहस्त्र नामें प्रभु ची आज देखील आणि पुढेही भक्तांना सुख शांती तसेच समाधान आत्मशांती देत राहणार फक्त त्यांच्या नामा वर प्रेम विश्वास असला पाहिजे.
राम नाम हे राम अवतार होण्या आधी पासून अस्तित्वात आहे ती अजित अनादी अमित अशी शक्ती आहे राम अवतारात होण्या अगोदर ब्रम्ह हत्ये चे पाप एका राजास लागले होते त्या पापा पासून मुक्त होण्यासाठी त्यांनी साधू संत व ऋषी मुनींचे आशिर्वाद व मार्गदर्शन घेण्याचे ठरवले अरण्यात त्यांना एक ऋषि ची कुटी भेटली ऋषी स्नान करण्या करिता गेले होते राजा ऋषी कुमार यांना भेटून आपल्या ब्रम्ह हत्ये चे पातक कसे नष्ट होईल असे विचारले ऋषी कुमार यांनी तीन वेळा राम नाम घ्या तुमचे पाप नष्ट होईल असे सांगितले राजा पाप मुक्त झाला ऋषी कुटीत आले तेव्हा पुत्रा ने त्यांना राजा विषयी सांगितले व राम नाम तीन वेळा घेण्यास सांगितले राजाचे पाप नष्ट झाले असे सांगितले त्या वेळी ऋषी पुत्रा वर क्रोधीत झाले तू तीन वेळा नाम घेण्यास का सांगितले एकदा च राम नामाचे उच्चारण केले तरी पातक नष्ट झाले असते ऋषींनी आपल्या पुत्रास शाप दिला तुला अधम म्हणून जन्म मिळेल व पदच्युत केले तोच ऋषी कुमार राम प्रभु च्या त्रेतायुगात निषाद राज गुह म्हणून जन्मास आले व राम प्रभु चा सहवास प्रेम त्यांना लाभले ही राम नामा ची महिमा आहे प्रेमाने श्रद्धेने समर्पण भावनेने राम नाम घेतल्यास त्याचा लाभ आपण वर्णू शकत नाही असे राम चरित्र आहे ह्या सर्व गूढ असे राम भक्ती पर प्रवचन सत्संग फल हारी बाबा च्या सहवासाने लाभला हे आमचे भाग्य ह्या प्रसंगी धर्मदासजी महाराज, मुन्ना महाराज, पिंटू महाराज, पप्पु महाराज, गोटू महाराज, रितेश परदेशी, जयराज अहिरराव , दिलीप भाऊ शर्मा, उत्तम गांगुर्डे, प्रशांत सोनार सुनील भाऊ नागापूरकर सर आधी सर्व भक्त उपस्थित होते