शिवशक्ती टाइम्स न्यूज
उपसंपादक – आनंद दाभाडे
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कृषी मंत्री दादासाहेब भुसे आणि शिवसेनेचे ठाणे येथील खासदार राजन विचारे आता एकमेकांचे व्याही होणार आहेत.
जसा महाराष्ट्रात व नाशिक जिल्ह्यात भुसे साहेब यांचा राजकारणात दबदबा आहे त्याप्रमाणे खासदार विचारे यांचाही राजकारणात दबदबा आहे. हे दोन्हीही नेते धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या कामकाजाच्या माध्यमातून शिवसेनेकडे आकर्षित झाले व शिवसेनेचे कार्यकर्ते झाले. या दोघे नेत्यांचे मातोश्रीवर व मुख्यमंत्र्यांच्या दरबारी चांगलेच वजन आहे.
अविष्कार भुसे हे युवासेनेचे सक्रिय नेते मानले जातात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात युवासेनेची मोठी फळी उभी केली असून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे व अविष्कार भुसे यांचे ते निकटवर्तीय आहे.
खासदार राजन विचारे यांची कन्या कु. लतिषा उच्चविद्याविभूषित असून त्यांचा व महाराष्ट्रातील लोकांचे भाईजी श्री अविष्कार दादाजी भुसे यांचा विवाह सोमवारी ठाणे येथील सुरज रिसॉर्ट मध्ये पार पडणार आहे त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनात शिवशक्ती टाईम न्युज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा