Breaking News

काँग्रेसच्या मतदारांचे क्रॉस व्होटिंग; भा.ज.पा.च्या उमेदवाराचा एकतर्फी विजय

शिवशक्ती टाइम्स न्यूज – प्रतिनिधी युसूफ पठाण

धुळे : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं.
पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे.
यापैकी धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल देखील लागला आहे.
काँग्रेसमधून भा.ज.पा.त आलेल्या अमरीश पटेल विजयी झाले आहेत.
पटेल यांची भा.ज.पा.मधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती.
दरम्यान,अमरिश पटेल विरोधकांची 115 मतं फोडण्यात यशस्वी झाले आहेत.
भा.ज.पा.चे 199 तर महाविकास आघाडीचे 213 मतदान केले होते.
काँग्रेसच्या किमान 57 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले असून, काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाली आहेत.
आघाडीच्या किमान 115 मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे.
तर 4 मते बाद झाली आहेत.
महाविकास आघाडीची 213 मते असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भा.ज.पा.ने ताकद पणाला लावली होती.
विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.
विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भा.ज.पा. पहिल्यांदाच समोरासमोर लढले आहेत.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.