Breaking News

ओबीसी मोर्चा दरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ पाथर्डी फाटा येथे रस्ता रोको

शिवशक्ती टाइम्स न्यूज

नाशिक, दि.३ डिसेंबर :-  मराठा आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका मांडून माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुणे शहरात आंदोलन केले. आंदोलन करताना भुजबळ यांना अटक झाल्याने अटकेच्या निषेधार्थ युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचावा संदर्भात विविध मागण्यांसाठी पुणे शहरात शनिवार वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी शनिवार वाडा येथून मोर्चा पुढे जाण्यासाठी निघाला असतांना ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारली. यावेळी पोलिसांकडून मज्जाव केल्याने समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांनी यांनी शनिवारी वाडा परिसरातील रस्त्यावर ठाण मांडत ठिय्या मांडत आंदोलन केले.  आंदोलनादरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवाना बळाचा वापर करून पोलिसांकडून अटक केली. ओबीसी आरक्षण बचावासाठी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्याबाबत पोलिसांना कल्पना असतानाही ऐनवेळी मोर्चा सुरू झाल्यावर मोर्चाला परवानगी नाकारण्यात येऊन समीर भुजबळ यांना अटक झाली.

ओबीसी जनजागृती मोर्चा शांततेच्या मार्गाने काढला असताना देखील समीर भुजबळ यांना अटक झाल्याने या दंडेलशाहीच्या विरोधात नाशिक शहरातील पाथर्डी फाटा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको मुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

यावेळी अंबादास खैरे, मकरंद सोमवंशी, मुख्तार शेख, मुकेश शेवाळे, अमर वझरे,  रवींद्र शिंदे, अमोल आव्हाड, जय कोतवाल, मुकेश शेवाळे, योगेश देसले, हर्षल चौधरी,अक्षय परदेशी, रोहित पाटील, मिलिंद सलोंकी, पप्पू मोरे, अक्षय विभुते, लकी पटेल, संदीप खैरे, विशाल माळेकर, अविनाश मालूजकर, सचिन बोरसे, अमित वझरे, सुमित वझरे, संदीप हाडगे, अक्षय परदेशी, जाणू नवले,पुष्पा राठोड, सुजाता कोल्हे, रवी शिंदे, महेश साळवे,बॉबी चावला आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Shivshakti Times

Check Also

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत निवेदन- राहुल भाईजी पवार

संभाजी भिडे मालेगावी होणाऱ्या कार्यक्रमास परवानगी नाकारण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन- राहुल भाईजी पवार शिवशक्ती …

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार

वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करणे महागडे ठरणार शिवशक्ती टाइम्स न्युज – (प्रतिनिधी युसूफ पठाण) यापुढे वाहतूक …

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन

‘दिव्य काशी, भव्य काशी ‘ निमित्ताने भाजपा तर्फे स्मशान मारुती येथे साधू संताचे पूजन शिवशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published.